Smartphone Tips : मोबइलवर कॉल आला, गाणी वाजली, पण आवाज कमी येतोय; काही सेकंदात असा करा प्रॉब्लेम सॉल्व्ह

Smartphone sound low fix: मोबाईलवर कॉल किंवा गाणी ऐकताना आवाज कमी येतोय का? स्पीकरमध्ये अडकलेली धूळ कारणीभूत असू शकते. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच आवाज सुधारता येतो.
mobile speaker problem
smartphone sound lowgoogle
Published On

दैनंदिन आयुष्यात आपल्याला मोबाईल खूप महत्वाचा झालाय. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण याचाच जास्त प्रमाणात वापर करत असतो. त्यामध्ये फक्त कॉलिंग नाहीतर गाणी ऐकणे, व्हिडोओ पाहणे, मुव्ही, बेव सिरीज, स्वत:चे व्हिडीओज पाहणं किंवा नवीन तयार करणे, सोशल मीडियावरील रिल्स स्कोल करणे अशा ना ना प्रकारच्या गोष्टींमध्ये मोबाईलचा वापर होतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे sound.

तुमच्या मोबाईलचा sound बेस्ट असेल तर प्रत्येकालाच कोणताही ऑडीओ, व्हिडीओ, गाणी ऐकताना, किंवा कॉलवर बोलताना त्रास होणार नाही आणि अडथळाही येणार नाही. त्यासाठी मोबाईलचा स्पिकर क्लिअर स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्यात जर कचरा, धूळ अडकली असेल तर फोनच्या soundची खराब होते. पण तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून क्वालिटी सुधारू शकता. पुढे याबद्दल माहिती दिली आहे.

mobile speaker problem
Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

सर्वात आधी मोबाईल बंद करा. याने कोणतेही तांत्रिक नुकसान होण्याचा धोका टाळता येतो. त्यानंतर मऊ आणि स्वच्छ ब्रशच्या मदतीने स्पीकरच्या भागावर साचलेली धूळ हलक्या हाताने काढा. ब्रश फार जोरात वापरू नका, कारण त्यामुळे घाण आत जाते.

जर तुमच्याकडे कंप्रेस्ड एअर उपलब्ध असेल, तर त्याचा हलक्या दाबाने वापर करून स्पीकरमधली धूळ बाहेर काढू शकता. मात्र एअर फार जवळून फुंकू नये. काही वेळा टेप किंवा चिकट पदार्थाच्या मदतीनेही स्पीकरवरील धूळ सहज काढता येते. चिकट बाजू स्पीकरवर हलकेच लावून काढल्यास वरची घाण निघून जाते.

अतिशय हट्टी घाण असल्यास टूथपिकसारख्या टोकदार वस्तूचा वापर करता येतो, पण हे करताना फार काळजी घेणं गरजेचं आहे. ती वस्तू स्पीकरच्या छिद्रात जास्त आत जाऊ देऊ नका. शेवटी मायक्रोफायबर कापडाने स्पीकरचा भाग स्वच्छ पुसल्यास उरलेली धूळही निघून जाते.

mobile speaker problem
Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com