Sakshi Sunil Jadhav
साडी हा असा पारंपरिक पोशाख आहे, जो प्रत्येक भारतीय महिलेला अधिकच सुंदर आणि एलिगंट दिसायला मदत करतो. मात्र चुकीची स्टायलिंग केल्यास विशेषतः प्लस साइज महिलांचा लुक जड आणि रुंद दिसू शकतो.
शिफॉन, जॉर्जेट, क्रेप आणि सॅटिनसारखे हलके फॅब्रिक निवडा. हे फॅब्रिक शरीरावर जास्त उठावदार दिसत नाही. सिल्क, ऑर्गेंझा आणि टिश्यू फॅब्रिक टाळा.
लहान किंवा मिडियम साइज प्रिंट्स, तसेच हलके फ्लोरल डिझाइन स्लिम लुक देतात. मोठे आणि बोल्ड प्रिंट्समुळे तुम्ही जाड दिसू शकता.
पर्पल, वाइन, मॅरून, बरगंडी, एमरल्ड ग्रीन, बॉटल ग्रीन, चॉकलेट ब्राउन हे डार्क रंग तुम्हाला स्लिम आणि उंच दिसण्यासाठी मदत करतात.
रुंद बॉर्डर असलेली साडी हेवी वाटते. त्यामुळे शक्यतो पातळ बॉर्डर किंवा बॉर्डरलेस साडी नेसा.
व्ही नेक किंवा स्वीटहार्ट नेकलाइनचा ब्लाउज शिवा या नेकलाइनमुळे मान लांब दिसते आणि शरीराचा समतोल राखला जातो.
ब्लाउजच्या स्लीव्ह्ज तीन इंच किंवा कोपरापर्यंत असतील तर हात आणि खांद्याचा भाग पाहायला जाड वाटत नाही.
अपर बॉडी किंवा हात जाड असतील, तर स्लीव्हलेस आणि हाय नेक ब्लाउज टाळा.
साडी आणि ब्लाउज एकाच रंगाचे असतील, तर स्लिम इफेक्ट मिळतो. जास्त कॉन्ट्रास्ट टाळा. साडी नीट बसलेली आणि घट्ट ड्रॅप केलेली असावी. या टिप्सने तुम्ही स्लिम दिसाल.