Sakshi Sunil Jadhav
मेदू वडा हा प्रत्येकाच्या नाश्त्यातला आवडीचा पदार्थ आहे. पुढे आपण ही रेसिपी सोप्या पद्धतीने झटपट कुरकुरीत कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत.
मेदू वडा बनवताना तो कुरकुरीत होत नाही, किंवा पीठ चवीला बरोबर लागत नाही. पुढे आपण वेगळ्या साहित्यात इंस्टंट वडा कसा बनवायचा जाणून घेऊयात.
मेदू वडा बनवताना तांदूळ किंवा डाळ भिजवावी लागणार नाही. तुम्ही मुलांच्या नाश्यासाठी वेगळ्या साहित्यात झटपच रेसिपी करू शकता.
ब्रेड स्लाईस, बारिक रवा, कडीपत्ता, चिलीफ्लेक्स, मीठ, तेल आणि पाणी इत्यादी साहित्य पुरेसं आहे.
सर्वप्रथम ब्रेड योग्य तारखेनुसार फ्रेश असणारे निवडा. मग त्याच्या कडा कापून पाण्यात भिजवून ठेवा.
पाण्यात ठेवलेले ब्रेडचे स्लाइस ओले झाले की हाताने दाबून त्यातले पाणी काढून घ्या. जे पुर्णपणे मॅश होतील अशाप्रकारे ओले करा.
ओल्या ब्रेडचा आता लगदा करून घ्या. त्यामध्ये बारिक चिरलेली कडीपत्याची पानं, चिलिफ्लेक्स आणि योग्यप्रमाणात मीठ घाला.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्याचे प्रमाण जास्त कमी ठेवू शकता. हे सगळे साहित्य एकत्र करून मळून घ्या.
आता मेदू वड्याप्रमाणे पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा. त्याला मधोमध छिद्र सुद्धा पाडा.
दुसऱ्या बाजूला कढईत तेल तापवत ठेवा. कडई जाड निवडा. तेल गरम झालं की मध्यम आचेवर करा.
शेवटी वडे तळून घ्या. वड्यांचा रंग बदलेपर्यंत ते तळा. खरपूस कुरकुरीत वडे चवीला उत्तम लागतात. तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत हे खाऊ शकता.