Skin Itching Symptoms: कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे खाज सुटते? यावर उपाय काय? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Vitamin Deficiency: अंगाला सतत खाज सुटत असेल तर ती केवळ घाम किंवा अ‍ॅलर्जी नसून शरीरातील व्हिटॅमिनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. जाणून घ्या कारणे व उपाय.
Vitamin deficiency and skin itching
Skin Itching Symptomsgoogle
Published On

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना स्वत: कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. दिवसभराचा कामाचा ताण, प्रवास याने खूप दमायला होतं. त्यामुळे रात्री लोक अंघोळ करणं टाळतात. याने तुमच्या शरीराला खाज सुटते. हे एक सामान्य लक्षण आहे. जे खूप लोक सहजपणे दुर्लक्षित करतात. पण फक्त घामामुळे किंवा डास चावल्यामुळे तुम्हाला खाज सुटत नाही, तर याचं कारण व्हिटॅमिन्सची कमतरता सुद्धा असू शकतं.

जेव्हा शरीराला खाज सुटते तेव्हा एखाद्या व्यक्तीला बसणं, उभे राहणं किंवा झोपणं कठीण होऊन जातं. यामुळे कामाच्या ठिकाणी खूप चिडचिड होते. खाज सुटणे ही फक्त त्वचेवर होणारी बाह्य समस्या नाही; ती शरीराच्या आत विकसित होणारा एक आजार आहे. लोक अनेकदा खाज सुटण्याला हे लिव्हरशी जोडतात, मात्र हे लक्षण शरीरात काही जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे असतं हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.

Vitamin deficiency and skin itching
Hair Care: केस गळतीच्या समस्या अन् चेहऱ्यावरचे मुरुम सगळेच होतील छुमंतर, वापरा फक्त हे ४ दाणे

त्वचेला खाज येणं हे अनेक आजारांचे लक्षण असू शकतं. खाज येण्याची इतर कारणं म्हणजे अंगावर उठणारे पित्त, गोल काळे डाग किंवा खरुज ही असू शकतात. याशिवाय अन्नाच्या अॅलर्जीमुळे सुद्धा खाज येऊ शकते.

कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे खाज येते?

शरीरात खाज येण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे शरीरात व्हिटॅमिनची कमतरता. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे खाज येऊ शकते. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि खाज सुटते. तर व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे त्वचेवर पुरळ, हात आणि पायांना खाज येते. व्हिटॅमिन बी ३ च्या कमतरतेमुळे सुद्धा अंगाला खाज सुटते. तर यामध्ये पुरळ आणि जखमा होतात. तर व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी ची कमतरतेचे हे लक्षण असू शकते.

घरगुती उपाय

कॅलामाइन लोशन

खाज कमी करण्यासाठी, तुम्ही कॅलामाइन लोशन लावू शकता. हे त्वचेला थंड करतं आणि खाज कमी करतं.

तेलाचा वापर

लॅव्हेंडर, पेपरमिंट आणि युकलिप्टस सारखे काही ऑइल खाज कमी करण्याचं काम करतं. तसेच या तेलांमधील गुणधर्म असतात आणि त्वचेवर लावल्याने ते थंडावा देतात.

बर्फाचा वापर

आईस पॅक उष्माघातापासून लगेच आराम देतात. जर तुमच्याकडे आईस पॅक नसेल तर बर्फाचा तुकडा कपड्यात गुंडाळून प्रभावित भागात लावा. यामुळे त्वचेची जळजळ कमी होईल. यामुळे त्वचेची अ‍ॅलर्जी कमी होऊ शकते आणि जळजळ कमी होऊ शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Vitamin deficiency and skin itching
World Cancer Day 2026: भारतात वाढतायेत कॅन्सरचे रुग्ण; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, वेळीच व्हा सावध

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com