

सध्या लाइफस्टाइलमध्ये अनेक बदल होत आहेत. विशेषत: झोपेच्या वेळांमध्ये हे बदल पाहायला मिळतात. काही लोक सोशल मीडियाच्या अतीवापरामुळे वेळेवर झोपणं टाळतात. काहीजण कामाच्या व्यापामुळे पुर्ण झोप घेत नाहीत. याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होतो आणि भविष्यात तुम्हाला गंभीर समस्यांनाही सामोरं जावं लागतं. पण काहींना रात्री झोप येत नाही. तासंतास लोक कुस बदलत राहतात. जेव्हा झोप येते तेव्हा काहीच क्षणात जाग येते. हे कोणत्या आजारांचं तर लक्ष नाही ना? जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी.
रात्री झोपेत सतत जाग येणं किंवा झोपताना जोरात घोरणं ही Sleep apnea या गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात. Sleep apnea आजारमध्ये झोपेत असताना श्वास थांबतो. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमी निर्माण होते आणि झोप मोड होते. काहींना याची जाणीव होत नाही, पण याचा परिणाम आरोग्यावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.
Sleep apneaची लक्षणं लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यावर डोकं दुखणं, दिवसभर प्रचंड झोप येणं, चिडचिडेपणा वाढणं आणि कोणत्याही कामात लक्ष केंद्रित न होणं अशी लक्षणे यामध्ये आढळतात. काही रुग्णांना सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडल्यासारखंही वाटतं. तज्ज्ञांच्या मते, ही सर्व लक्षणं स्लीप एप्नियासारख्या धोकादायक आजाराची पुर्व सूचना देऊ शकतात.
जर एकाच वेळी अशी अनेक लक्षणे जाणवत असतील, तर वेळ वाया न घालवता वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं आहे. तसेच जीवनशैलीत बदल करणं सुद्धा महत्वाचं आहे. वजन नियंत्रणात ठेवणं, धूम्रपान आणि मद्यपान टाळणं, तसेच झोपेच्या सवयी वेळा सुधारण्यावर भर देणं गरजेचं आहे. जीवनशैलीतल्या या बदलांनंतरही फरक जाणवत नसेल, तर डॉक्टर सीपीएपी मशीन वापरण्याचा सल्ला देऊ शकतात. त्यामुळे स्लीप एप्नियाची लक्षणे ओळखून वेळेत उपचार घेणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.