Sakshi Sunil Jadhav
भारतात तुम्हाला हुबेहुब परदेशासारखं ठिकाण पाहायचं असेल तर तुम्ही लवासा या मुंबई-पुण्याजवळच्या ठिकाणाला भेट देऊ शकता. जे अगदी युरोपसारखं दिसतं.
लावासा हे इटलीतलं प्रसिद्ध शहर पोर्टोफिनो (Portofino) च्या सारखं विकसित करण्यात आलं आहे. रंगीत इमारती आणि कोबलस्टोन रस्ते युरोपची आठवण करून देतात.
वारसगाव लेकच्या निळ्याशार पाण्याच्या काठावर वसलेलं लावासा अत्यंत निसर्गरम्य आहे. पाणी, डोंगर आणि रंगीबेरंगी इमारती यांचा अप्रतिम संगम इथे पाहायला मिळतो.
हे एखादं नैसर्गिकरित्या वाढलेलं गाव नसून, आधुनिक टाउन प्लॅनिंगनुसार विकसित केलेलं शहर आहे. त्यामुळे स्वच्छ रस्ते आणि नीटनेटका परिसर दिसतो.
संध्याकाळी तलावाच्या काठावर असलेल्या प्रोमेनेड वर फिरणं, सायकल चालवणं म्हणजे जणू एखाद्या परदेशी सिनेमातलं दृश्य अनुभवण्यासारखं.
इथे जेट स्कीइंग, कयाकिंग, ट्रेकिंग यांसारख्या साहसी उपक्रमांचा आनंद घेता येतो.
लावासामध्ये विविध कॅफे आणि रेस्टॉरंट्स आहेत, जिथे देश-विदेशातील पदार्थ चाखता येतात. तलावाकाठी कॉफी घेत सूर्यास्त पाहणं हा खास अनुभव आहे.
इथले रिसॉर्ट्स आणि हॉटेल्समधून तलाव व डोंगरांचं अप्रतिम दृश्य दिसतं, जे मनाला पूर्ण समाधान देतं.
लावासा पुण्यापासून सुमारे 60 किमी आणि मुंबईपासून 190 किमी अंतरावर आहे. रस्तेमार्गे प्रवास सर्वात सोयीचा असून, सह्याद्रीतील वळणावळणाचे रस्ते प्रवास आणखी खास बनवतात.