World Cancer Day 2026: भारतात वाढतायेत कॅन्सरचे रुग्ण; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, वेळीच व्हा सावध

Cancer In India: जागतिक कर्करोग दिनानिमित्त भारतात वाढणाऱ्या कॅन्सर रुग्णसंख्येवर तज्ज्ञांचा इशारा. सुरुवातीची लक्षणं ओळखून वेळीच उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो.
Rising Cancer Cases in India
World Cancer Day 2026google
Published On

४ फ्रेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिवस मानला जातो. या दिवशी कॅन्सरबाबत जनजागृती केली जाते. तसेच त्यावर लवकर निदान, प्रतिबंध आणि चांगले उपचार मिळावेत म्हणून हा दिवस साजरा केला. कारण सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकजण नकळत जीवघेण्या सवयी लावतात. याचा आकडा भारतात मोठ्या प्रमाणात आहे. रोज लाखो लोक या आजाराने मरण पावत आहेत. त्यामुळे या आजारावर वेळीच उपचार करुन त्यावर योग्य आणि व्यवस्थित उपचार करणं महत्वाचं आहे.

अनेकदा असं जाणवतं की, लोकांना कॅन्सरची लक्षणं लवकर जाणवत नाहीत. त्यामुळे हा आजार दिवसेंदिवस वाढत जातो. तर शेवटच्या टप्प्यात त्याचा डॉक्टर तपासणी करतात. त्यावेळेस आपण उपचाराला सुरुवात तर करतो. पण तो वर तुमच्या हातातून वेळ गेलेली असते. त्यामुळे सगळ्यांनी आणि विशेषत तरुणांनी त्यांच्या काही टेस्ट किंवा बराच काळ सुरु असणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं थांबवलं पाहिजे. कॅन्सर वेळेवर ओळखून उपचार करता येतात. हे कमी खर्चिक आणि जास्त फायदेशीर ठरू शकतं, असा महत्वाचा संदेश या दिवशी दिला जातो.

Rising Cancer Cases in India
Jowar Chakli Recipe: ज्वारीच्या पीठाच्या कुरकुरीत खमंग चकल्या कधी खाल्ल्यात का? आत्ताच वाचा नोट करा रेसिपी

भारतात वाढतोय कर्करोगाचा धोका?

तज्ज्ञांच्या मते भारतात दरवर्षी कर्करोगाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत झालेली पाहायला मिळत आहे. बदलती जीवनशैली, तंबाखूचं वाढतं सेवन, प्रदूषण आणि ग्रामीण भागातल्या आरोग्यसेवांचा अभाव यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात पोहोचतात त्यामुळे उपचार गुंतागुंतीचे ठरतात.

लवकर उपचार का महत्वाचे?

कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात आढळल्यास रुग्ण बरे होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. तज्ज्ञ सांगतात की लवकर निदानामुळे शस्त्रक्रिया आणि उपचार मर्यादित राहतात तसेच रुग्णाचं आयुष्य टिकून राहतं. स्तन, गर्भाशयाचे मुख, तोंड, फुफ्फुस आणि आतड्यांचे कॅन्सर सुरुवातीला ओळखता येऊ शकतात.

दुर्लक्षित करू नयेत अशी सुरुवातीची लक्षणे

अचानक वजन कमी होणे, सतत थकवा येणे, न बऱ्या होणाऱ्या जखमा, स्तनातील गाठ, दीर्घकाळ असलेला खोकला, गिळताना त्रास किंवा सतत वेदना ही कॅन्सरची सुरुवातीची चिन्हं असू शकतात. ही लक्षणं दोन ते तीन आठवडे टिकत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Rising Cancer Cases in India
Aadhaar Update: आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा दुरुस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com