

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना कमी वयातच जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. लोकांना फीट राहायचं असतं पण चांगल्या सवयी आत्मसाद करायच्या नसतात. पैशांसाठी आणि चांगल्या लाइफस्टाइलसाठी लोक दिवसरात्र मेहनत करतात. पण छोटे मोठे आजार ते सतत दुर्लक्षित करतात.
त्याने भविष्यात एकदाच आपल्याला मोठा आजार आणि त्याच्या शेवटचा टप्पा असल्याचं कळतं. त्यावर उपचार करणंही कठीण होऊन जातं. त्यात कॅन्सरसारख्या आजाराची लक्षण ओळखणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागतो.
तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी जगभरात कॅन्सरचे लाखो रुग्ण वाढत चालले आहेत. त्याची लक्षणे उशीरा ओळखल्यामुळे त्यावर योग्य वेळी उपचार झाले नाहीत आणि त्यांना जीव गमवावा लागला आहे. कॅन्सर हा एका रात्रीत होत नाही. तो हळूहळू वाढतो आणि गंभीर होण्याआधी शरीर अनेक इशारे देत असतं. चुकून, ही सुरुवातीची लक्षणं अनेकदा लोकांकडून दुर्लक्षित होतात. पुढे आपण त्याच लक्षणांबद्दल आणि रोजच्या सवयींच्या चुकांबद्दल जाणून घेणार आहोत.
तज्ज्ञांच्या मते, शरीरातील काही बदल हे कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील लक्षणं असू शकतात. उदाहरणार्थ, अचानक किंवा कोणतंही कारण नसताना हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे. हे कॅन्सरचे सायलेंट लक्षण असू शकते. कारण नसताना अॅनिमिया होणे हे सुद्धा कॅन्सरच्या एका प्रकाराचे लक्षण आहे.
तसेच कोणताही डाएट, व्यायाम किंवा जीवनशैलीत बदल न करता अचानक वजन कमी होत असेल तर सावध राहील पाहिजे. रोज उठल्यावर थकवा जाणवणे, कमजोरी वाटणे हे सुद्धा लक्षण कॅन्सरचे असू शकते. तसेच त्वचेतील बदलांकडेही लक्ष द्या. तीळाचा आकार, रंग किंवा रूप बदलणं, जखमा उशिरा भरून येणं किंवा त्वचेचा रंग अचानक बदलणं ही स्कीन कॅन्सरची किंवा अन्य गंभीर समस्यांची लक्षणे असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्लाने त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.