Sakshi Sunil Jadhav
सणासुदीला किंवा चहाबरोबर खाण्यासाठी ज्वारीच्या कुरकुरीत चकल्या हा आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय मानला जातो. कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीत या चकल्या कशा बनवायच्या जाणून घ्या.
ज्वारीचे पीठ, तीळ, ओवा, तिखट, हळद आणि मीठ अशा मोजक्या पदार्थांत चकल्या तयार होतात.
तिखट आणि हळद टाकलेले उकळते पाणी पिठात मिसळल्याने चकल्या जास्त खमंग होतात.
१० ते १५ मिनिटे पीठ झाकून ठेवल्याने ते मऊ होते आणि चकल्या चांगल्या आकाराच्या बनतात.
पीठ ५ ते १० मिनिटे हाताने मळल्यास चकल्या कुरकुरीत होतात.
मध्यम आचेवर चकल्या तळल्यास त्या सोनेरी रंगाच्या आणि आतून व्यवस्थित तळल्या जातात.
तेलातील बुडबुडे शांत झाले की चकल्या तळून झाल्याचे ओळखावे.
चकल्या पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवल्यास त्या अनेक दिवस खमंग राहतात.