Shukar Gochar 2023 : शुक्र ग्रहाचे सिंह राशीत संक्रमण! या राशींचे बदलणार भाग्य, होईल धनलाभ

Shukra In Kundali : शुक्राच्या स्थितीतील बदलाचा लोकांच्या आर्थिक स्थितीवर, आनंदावर, प्रेम जीवनावर मोठा प्रभाव पडतो.
Shukra Gochar 2023
Shukra Gochar 2023Saam Tv

Shukra In Sinh Rashi :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. ज्यामुळे प्रत्येक ग्रहांचा बारा राशींवर विशिष्ट प्रभाव पडतो. सध्या शुक्र कर्क राशीत असून २ ऑक्टोबरला सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

शुक्र हा सिंह राशीत प्रवेश करत असल्यामुळे ४ राशींना फायदा होईल. त्यांना राजासारखे जीवन मिळेल. जीवनात भौतिक सुख येईल. यश आणि संपत्ती मिळेल. जाणून घेऊया कोणत्या 4 राशींसाठी शुक्राचे सिंह राशीत होणारे संक्रमण फायदेशीर ठरेल.

Shukra Gochar 2023
Bad Cholesterol : सतत वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलमुळे वैतागले आहात? आयुर्वेदातील हा उपाय ठरेल रामबाण

1. कर्क :

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण अधिक फायदेशीर ठरणार आहे. आयुष्यात प्रगती कराल, हा काळ तुम्हाला विशेषत: आर्थिक (Money) लाभ देईल. मोठी भौतिक इच्छा पूर्ण होतील.

2. तूळ:

ऑक्टोबरमध्ये होणारे शुक्राचे संक्रमण या लोकांना पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल. नवीन नोकरी (Job) मिळेल. महागडी वस्तू खरेदी करु शकता. नशीब तुम्हाला साथ देईल.

3. वृश्चिक:

शुक्राच्या बदलामुळे करिअरमध्ये फायदा होईल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यापारी वर्गाला विशेष लाभ होईल. रखडलेली कामे (Work) मार्गी लागतील.

Shukra Gochar 2023
Healthy Breakfast Food : सकाळच्या नाश्त्यात खा हे 8 सुपरफूड, दिवसभर टिकून राहिल एनर्जी

4. धनु:

धनु राशीच्या लोकांना शुक्र संक्रमणामुळे भाग्याची साथ मिळेल. कामात सहज यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com