Healthy Breakfast Food : सकाळच्या नाश्त्यात खा हे 8 सुपरफूड, दिवसभर टिकून राहिल एनर्जी

कोमल दामुद्रे

नाश्ता

सकाळच्या नाश्ता नेमका कसा करावा हा प्रश्न अनेकांना पडतो.

या पदार्थांचे करा सेवन

आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे नाश्त्यात खाल्ल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहिल.

केळी

केळीमध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि पोटॅशियम असते. त्यामुळे सकाळी केळी खाल्ल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.

पीनट बटर

नाश्त्यामध्ये पीनट बटरचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.

पेरु

पेरुमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. नाश्त्यात पेरु खाल्ल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अंडी

अंडी हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. सकाळी लवकर अंडी खाल्ल्याने शरीरात दिवसभर एनर्जी टिकून राहण्यास मदत होते.

दही

दह्यामध्ये प्रथिनेही पुरेशा प्रमाणात आढळतात. नाश्त्यात दही सेवन करणे फायदेशीर आहे.

टोफू

नाश्त्यात टोफू खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे नाश्त्यामध्ये टोफूचा समावेश करणेही फायदेशीर ठरू शकते.

बदाम

सकाळी बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नाश्त्यात बदामाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

चिया सिड्स

चिया सिड्स खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम, प्रथिने आणि फायबरसारखे अनेक पोषक घटक मिळतात. चिया सिड्स खाल्ल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Next : महिनाभर मीठ खाल्लं नाही तर? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम