कोमल दामुद्रे
खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे बॅड कोलेस्ट्रॉल ही गंभीर समस्या बनली आहे.
शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास कोणतीही लक्षणे दिसत नाही. परंतु, यामुळे तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हृदयाला जास्त प्रमाणात काम करावे लागते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
तुळशीची पाने खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. नियमितपणे याचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होईल.
खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा चहा पिऊ शकता. जो खूप फायदेशीर ठरेल. रोज तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने शिरांमध्ये साचलेली घाण सहज निघून जाते.
तुळशीच्या चहाऐवजी तुम्ही तुळशीच्या पानांचा रस देखील पिऊ शकता. ज्यामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल सहज कमी होईल.
खराब कोलेस्ट्रॉलच्या समस्येला तोंड देण्यासाठी तुम्ही चटणी बनवून तुळशीची पानेही खाऊ शकता.
खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पावडरचे सेवन करु शकता. रोज कोमट पाण्यासोबत प्यायल्याने नसांमध्ये जमलेली घाण निघून जाण्यास मदत होईल.