Shani-Surya Gochar 2023 : शनीचे सूर्य ग्रहात संक्रमण ! या 4 राशींचे येणार अच्छे दिन, मिळेल पैसाच पैसा

Shani Shukra Yuti : १२ राशींच्या लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ घडू शकते.
Shani-Surya Gochar 2023
Shani-Surya Gochar 2023Saam Tv
Published On: 

Shani Vakri Surya Gochar 2023 : सूर्य व शनी हे दोन्ही ग्रह पिता-पुत्रासारखे. या दोन्ही ग्रहांचे संक्रमण होत असल्यामुळे काही राशींना याचा फायदा होईल तर काहींना याचा त्रास. यामुळे १२ राशींच्या लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ घडू शकते.

१५ जून रोजी सूर्य मिथून राशीत प्रवेश करेल पण २ दिवसांनी १७ जूनला शनी पुन्हा मागे फिरेल. यामुळे शनि व सूर्याच्या स्थितीत अनेक बदल घडतील. ज्यामुळे अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम (Disadvantage) होणार आहे. शनि आणि सूर्याचे संक्रमण 4 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देईल. चला जाणून घेऊया कोणत्या राशीमध्ये सूर्य आणि शनिच्या संक्रमणामुळे बदल घडणार आहेत ते.

Shani-Surya Gochar 2023
Surya Gochar 2023 : सूर्याचे मिथुन राशीत संक्रमण ! 15 जूननंतर या 3 राशींचे भाग्य खुलणार, नोकरीतही होतील अनेक बदल

1. मिथुन-

सूर्य आणि शनीचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना खूप शुभ फल देईल. जीवनाच्या विविध क्षेत्रात तुम्हाला यश (Success) मिळेल. घरात सुख-शांती नांदेल. पैसे (Money) येतील. करिअरमध्ये फायदा होईल. मुलांशी संबंधित कोणतीही सुखद माहिती मिळू शकेल.

2. सिंह-

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य आणि शनीच्या युतीचा या वेळी लोकांना खूप लाभ देईल. नोकरी-व्यवसायात मोठे पाऊल उचलाल आणि त्याचा फायदा होईल. करिअरमध्ये यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नशिबाची साथ मिळेल आणि कामे पूर्ण होतील.

Shani-Surya Gochar 2023
Shukra Gochar 2023 : कर्क राशीत शुक्र ग्रहाचे गोचर ! येत्या 42 दिवसांत या तीन राशी होतील मालामाल, प्रेमयुगुलांचे येणार अच्छे दिन...

3. कन्या -

नोकरदार व व्यापारी वर्गाला सूर्य आणि शनीच्या चालीमुळे मोठा फायदा होईल. गुंतवणुकीतून लाभ होईल. कोणतेही मोठे काम पूर्ण होऊ शकते. जीवनात यशस्वीपणे पुढे जाल. नातेसंबंध सुधारतील आणि आरोग्य उत्तम राहील.

Shani-Surya Gochar 2023
Lizards At Home : झोपेतून उठल्यानंतर पाल दिसली तर, समजा...

4. मकर-

हे संक्रमण मकर राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. भाग्य सकारात्मक परिणाम देईल. लव्ह लाईफ चांगले होईल. आर्थिक लाभ होईल. पैशाशी संबंधित समस्या संपतील. प्रयत्न करत राहा, व्यवसायात प्रगती होईल. कोणत्याही आजार किंवा समस्येपासून मुक्ती मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com