Shukra Gochar 2023 : कर्क राशीत शुक्र ग्रहाचे गोचर ! येत्या 42 दिवसांत या तीन राशी होतील मालामाल, प्रेमयुगुलांचे येणार अच्छे दिन...

Shukra In Kundali : ७ जुलै पर्यंत कर्क राशीत शुक्र ग्रह विराजमान असणार आहे.
Shukar Gochar 2023
Shukar Gochar 2023Saam Tv

Shukra Che Rashi Parivartan : ज्योतिष्यशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या बदलामुळे त्याचे विशिष्ट राशीवर परिणाम होत असतात. ज्याचा शुभ व अशुभ योग तयार होतो. या योगांमुळे सुख-दु:ख व लाभ-हानी होत असते.

७ जुलै पर्यंत कर्क राशीत शुक्र ग्रह विराजमान असणार आहे. त्यामुळे धन योग तयार झाला आहे. यामुळे प्रेमयुगुलांच्या जीवनात (Life) अनेक बदल येतील, धन-संपत्तीत अधिक वाढ होईल, करिअरच्या (Career) नव्या संधी मिळतील. तसेच दुसरीकडे, 3 राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचरातून झालेला धन योग जोरदार लाभ देईल. जाणून घेऊया धन राजयोग कोणत्या राशीच्या लोकांचे भाग्य उजळवणार आहे.

Shukar Gochar 2023
Budh Gochar 2023 : मेष राशीत बुधाचे संक्रमण ! या 5 राशींच्या कष्टाचं होईल चीज; अपूर्ण इच्छा होतील लवकरच पूर्ण...

1. मिथुन:

मिथुन राशीचा स्वामी बुध असून बुध-शुक्र हे अनुकूल ग्रह आहेत. अशा स्थितीत मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राच्या संक्रमणाने तयार झालेला धनयोग शुभ आहे. धन योग या लोकांना श्रीमंत करेल. कोणत्याही क्षेत्रातून भरपूर पैसा मिळू शकतो. नोकरी-व्यवसायात (Business) प्रगती होईल. तुमच्या आयुष्यात आनंद येईल. अविवाहित लोक विवाह करू शकतात.

2. कर्क :

शुक्र गोचर करून कर्क राशीत येत असल्यामुळे धनप्राप्ती होईल. हा धन योग कर्क राशीच्या लोकांना भरपूर संपत्ती देईल. त्यांच्या जीवनात विलास वाढेल. तुम्ही ऐषोरामात जीवन जगाल. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग मिळतील. हवीतशी प्रगती मिळेल. मानसन्मान मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

Shukar Gochar 2023
Shani Vakri 2023 : 4 महिने सोन्यासारख्या चमकतील या 5 राशी, पडेल पैशांचा पाऊस; शनिच्या वक्रीमुळे मिळेल राजासारखे जीवन !

3. कन्या

धन योग कन्या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ देईल. हा राजयोग या लोकांना आर्थिक तंगी आणि जुन्या समस्यांपासून दिलासा देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. पद आणि सन्मान वाढेल. तुमच्या जीवनात आनंद येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच्या रोमान्समध्ये हरवून जाल. अविवाहित लोकांचे विवाह लवकरच होऊ शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com