Surya Gochar 2023 : सूर्याचे मिथुन राशीत संक्रमण ! 15 जूननंतर या 3 राशींचे भाग्य खुलणार, नोकरीतही होतील अनेक बदल

Surya Gochar in Mithun rashi : 15 जून 2023 रोजी सूर्य गोचर करून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.
Surya Gochar 2023
Surya Gochar 2023Saam Tv
Published On

Surya Transit 2023 : ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यदेवाला अनेक ग्रहांचा कारक मानले जाते. ग्रहांच्या परिवर्तनामुळे अनेक राशींवर त्याचा विशिष्ट परिणाम होतो. सूर्य देवाला यश, आत्मविश्वास, पिता, आत्मा, नोकरी, प्रशासन आणि आरोग्याचा कारक मानले जाते.

15 जून 2023 रोजी सूर्य गोचर करून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीतील सूर्याचे संक्रमण 3 राशीच्या लोकांसाठी विशेषतः शुभ राहील. या लोकांना अचानक आर्थिक (Money) लाभ होऊ शकतो. नोकरी (Job)-व्यवसायात मोठी प्रगती होऊ शकते. आर्थिक स्थितीत तेजी येऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी हे सूर्य संक्रमण राशींसाठी कसे बदल घडवेल ते.

Surya Gochar 2023
Budhaditya Yog 2023 : बुधादित्य राजयोगामुळे या 3 राशींची होणार चांदी ! प्रगतीचे अनेक नवे मार्ग खुलतील

1. मिथुन :

सूर्याचे भ्रमण मिथुन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे उच्चपदस्थ लोकांशी संबंध निर्माण होतील. तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि वाणीच्या जोरावर तुम्ही अनेक गोष्टी पूर्ण कराल. हा काळ धनलाभही देईल. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात आणि तुम्ही बचत देखील करू शकाल. आरोग्य (Health) चांगले राहील, तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल.

2. तूळ :

सूर्याच्या राशी बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना अनेक प्रकारे फायदा होईल. तुमचे नशीब उजळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. घरात कोणताही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. तुमची कोणतीही मोठी इच्छा किंवा स्वप्न पूर्ण होऊ शकते. आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. उलट अचानक कुठूनतरी भरपूर पैसाही मिळू शकतो.

Surya Gochar 2023
Shukra Gochar 2023 : या 3 राशींचे भाग्य खुलणार, पुढचे 37 दिवस होणार मालामाल !

3. कुंभ :

सूर्याच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. चालू असलेल्या जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. अचानक कुठूनतरी पैसे मिळाल्याने तुमच्या काही मोठ्या समस्या दूर होऊ शकतात. जोडीदाराकडून लाभ होईल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com