Mahindra Scorpio N: कार खरेदीचा प्लॅन आहे? थांबा! Mahindra Scorpio N Facelift लवकरच येणार; जाणून घ्या फीचर्स, किंमत

Scorpio N Facelift Latest Update: महिंद्रा स्कॉर्पियो N फेसलिफ्ट 2026 मध्ये भारतात लॉन्च होण्याची शक्यता असून, प्रीमियम डिझाइन, अपडेटेड फीचर्स आणि दमदार इंजिनसह ही SUV कारप्रेमींमध्ये मोठी चर्चा निर्माण करू शकते.
Scorpio N 2026 launch
Mahindra Scorpio N Facelift google
Published On

तुम्ही येत्या वर्षात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. येत्या वर्षात महिंद्राची लोकप्रिय SUV स्कॉर्पियो N लवकरच बाजारात दाखल होणार आहे. कार प्रेमींसाठी ही सगळ्यात बेस्ट कार असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार Mahindra Scorpio N Facelift भारतात 2026 च्या पहिल्या महिन्यात एक दमदार कार लॉन्च करण्याची शक्यता आहे.

स्कॉर्पियो N चा मिड-लाइफ अपडेट असेल आणि 2026 मध्ये महिंद्राकडून सादर होणारा मोठा फेसलिफ्ट मॉडेल ठरणार आहे. याआधी कंपनी XUV 7XO म्हणजेच सध्याच्या XUV700 चे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणणार आहे. तसेच महिंद्रा स्कॉर्पियो N मजबूत बॉडी, दमदार इंजिन आणि उत्कृष्ट ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी ओळखली जाते.

Scorpio N 2026 launch
Sweet Potato Bhaji: रताळ्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत, टिफीनसाठी ठरेल बेस्ट रेसिपी

फेसलिफ्टच्या मदतीने या कारमध्ये जास्त प्रीमियम लूक आणि अपडेट्स फिटर्स पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एक्सटीरियर डिझाइनमध्ये हेडलाइट्स, टेल-लाइट्स आणि फॉग लॅम्प्सच्या डिझाइनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय SUV मध्ये नवीन ट्रिम एलिमेंट्स आणि फ्रेश अलॉय व्हील डिझाइन दिले जाऊ शकते. मात्र, अलॉय व्हीलचा साइज सध्याच्या 18-इंचप्रमाणेच ठेवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंटीरियरबाबत सध्या अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, महिंद्राच्या अलीकडील मॉडेल्स पाहता फीचर्समध्ये मोठे अपडेट मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. यामध्ये सध्याच्या ८ इंच टचस्क्रीनऐवजी 10.25 इंचाचा मोठा इंफोटोनमेंट सिस्टम देण्यात येऊ शकतो. त्यामध्ये थ्री-रो सीटिंग लेआउट असेल, ADAS फीचर सेट, 12-स्पीकर सोनी साउंड सिस्टम आणि ड्यूल-झोन क्लायमेट कंट्रोलसारखे प्रीमियम फीचर्स फेसलिफ्ट मॉडेलमध्येही मिळण्याची शक्यता आहे.

पॉवरट्रेनच्या बाबतीत मात्र कोणताही बदल होण्याची अपेक्षा नाही. नवीन स्कॉर्पियो N मध्ये सध्याप्रमाणेच 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर डिझेल इंजिनचे पर्याय मिळतील. हे दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध असतील. डिझेल व्हेरिएंटच्या निवडक टॉप मॉडेल्समध्ये 4x4 सिस्टमही देण्यात येईल.

फेसलिफ्ट महिंद्रा स्कॉर्पियो N ची संभाव्य किंमत सुमारे 14 लाख ते 26 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. नव्या अपडेट्ससह ही SUV पुन्हा एकदा भारतीय बाजारात मोठी चर्चा निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Scorpio N 2026 launch
Kitchen Hacks: गॅसवर ठेवताच दूध पटकन फाटते? गरम करताना ही गोष्ट लक्षात ठेवाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com