Sakshi Sunil Jadhav
स्वयंपाकघरात दूध फाटणं ही अनेक घरांमधील सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. थोडीशी चूक झाली तरी दूध फाटतं आणि चहा, कॉफी किंवा पदार्थ वाया जाण्याची शक्यता असते.
दूध उकळण्याचं भांडं पूर्णपणे स्वच्छ असावं. आधी वापरलेल्या आंबट पदार्थांचे अंश राहिले तर दूध पटकन फाटू शकतं.
जास्त आचेवर दूध उकळल्यास ते पटकन उकळून फाटण्याची शक्यता वाढते. नेहमी मध्यम किंवा मंद आच वापरा.
दूध तळाशी चिकटू नये म्हणून सतत ढवळणं गरजेचं आहे. यामुळे दूध एकसारखं तापतं.
फ्रिजमधून काढलेलं थंड दूध थेट उकळल्यास फाटू शकतं. आधी 5–10 मिनिटं बाहेर ठेवा.
झाकण लावल्याने वाफ आत अडकते आणि दूध सांडण्यासोबत फाटण्याचा धोका वाढतो.ध्ये ठेवा. गरम दूध थेट फ्रिजमध्ये ठेवल्यास ते लवकर फाटतं.
दूध उकळताना चिमूटभर साखर किंवा बेकिंग सोडा घातल्यास दूध फाटण्याची शक्यता कमी होते.
पाण्याचे थेंब किंवा आंबट पदार्थ लागलेला चमचा दूध फाटवू शकतो. म्हणून दूध काढताना ओला चमचा वापरू नका.
दूध उकळल्यानंतर भांडं थंड पाण्यात ठेवले तर दूध टिकून राहतं. उकळलेलं दूध पूर्ण थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवा.