Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांना टिफीनमध्ये पालेभाज्या किंवा हिरव्या रंगाच्या भाज्या खायला आवडत नाहीत. अशावेळेस तुम्ही रताळ्याचे चमचमीत पदार्थ बनवू शकता.
रताळ्याची भाजी चवीला थोडीशी गोड आणि पचनाला हलकी आणि बनवायला सोपी असते. चला जाणून घेऊयात रेसिपी.
रताळी, तेल, जिरे, हळद, लाल तिखट, धणे पावडर, मीठ, हिरवी कोथिंबीर, पाणी इत्यादी साहित्यात भाजी तयारी तयार होईल.
रताळ्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम रताळी सोलून मध्यम आकाराचे तुकडे करा.
एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर हळद, लाल तिखट आणि धणे पावडर घाला.
मसाले हलके परतल्यावर रताळ्याचे तुकडे घालून चांगले ढवळा. चवीनुसार मीठ आणि अर्धा कप पाणी घाला.
कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर १०–१२ मिनिटे शिजवा. रताळी मऊ झाल्यावर गॅस बंद करा.
भाजी वरून हिरवी कोथिंबीर घालून भाजी सजवा. ही भाजी पोळी किंवा भाकरीसोबत चविष्ट लागते.