अनेक तरुणांचा ड्रिम जॉब लवकरच पूर्ण होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हजारो पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांनी लवकरच तयारीला लागायला हवे.
या बाबतची अधिक माहिती आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत साइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करु शकतो. आजपासून या पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. जाणून घेऊया अर्ज कसा करायचा ते
1. जागा किती?
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) ६१६० पदांसाठी अतिरक्त जागा आहे. त्यासाठी उमेदवारांनी लवकर तयारी करायला हवी.
2. शिक्षणाची अट
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्याची तारीख
अर्ज सुरु होण्याची तारीख (Date): १ सप्टेंबर, २०२३
शेवटची तारीख - २१ सप्टेंबर, २०२३
4. निवड प्रक्रिया
या परीक्षेसाठी (Exam) उमेदवाराची चाचणी ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषांच्या माध्यामातून केली जाणार आहे. यात लेखी परीक्षेत १०० गुणांसाठी १०० प्रश्न असतील आणि त्यात परीक्षेचा कालावधी हा ६० मिनिटांचा असेल.
5. प्रश्नपत्रिका १३ भाषांमध्ये उपलब्ध
या परीक्षेत उमेदवार १३ प्रादेशिक भाषेंमध्ये देता येणार आहे. यात इंग्रजी, हिंदी वगळता आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्ल्याळम, मणिपूरी, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू भाषांमध्ये प्रश्नपत्रिका असणार आहे.
6. वयोमर्यादा
अधिसुचनेनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्ष असायला हवे.
7. अर्जाची फी
सामान्य/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना 300 रुपये शुल्क भरावे लागेल.
SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.