Janmashtami 2023 Date : श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? 6 की, 7 सप्टेंबर जाणून घ्या तिथी व शुभ मुहूर्त

Janmashtami 2023 Date, Tithi, Puja, Muhurt : हा दिवस भगवान श्रीकृष्णाची जयंती कृष्ण जन्मोत्सव म्हणून ओळखली जाते.
Janmashtami 2023 Date
Janmashtami 2023 DateSaam tv

Shri Krishna Janmashtami 2023 Tithi :

हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमीला अधिक महत्त्व आहे. श्रावणातील तिसरा महत्त्वाचा सण जन्माष्टमी. हा दिवस भगवान श्रीकृष्णाची जयंती कृष्ण जन्मोत्सव म्हणून ओळखली जाते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते. श्रावणातला हा सगळ्यात मोठा सण आहे. हिंदू धर्मानुसार या दिवशी बाळलिलेच्या म्हणजेच लड्डू गोपालची या दिवशी पूजा केली जाते.

Janmashtami 2023 Date
Shri Krishna Janmashtami 2023: तब्बल ३० वर्षांनी शुभ संयोग! श्रीकृष्ण जन्माष्टमीला करा हे उपाय, अपूर्ण इच्छा होतील पूर्ण

द्वापार युगात श्रीकृष्णाने (Shri Krishna) आपला आठवा अवतार घेतला होता. हिंदू पंचागानुसार श्रीमद भागवत पुराणानुसार श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, वृषभ राशी आणि बुधवारी झाला होता. यंदा जन्माष्टमीला बुधवार आल्यामुळे शुभ संयोगही जुळून आला आहे. या दिवशी रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार झाले आहेत. परंतु ही जन्माष्टमी ६ की, ७ तारखेला कधी साजरी केली जाईल हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

1. जन्माष्टमी 2023 तारीख

  • श्रावण कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami) तारीख - 06 सप्टेंबर 2023, दुपारी 03.37 वाजता

  • श्रावण कृष्ण अष्टमी तिथी समाप्त - ०७ सप्टेंबर २०२३, दुपारी ०४.१४

Janmashtami 2023 Date
Turtiche Fayde: त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे तुरटी, फायदे वाचाल तर रोज वापराल

2. 6 किंवा 7 सप्टेंबर 2023 रोजी जन्माष्टमी कधी साजरी केली जाईल?

  • 6 सप्टेंबर 2023 रोजी जन्माष्टमी साजरी करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. रोहिणी नक्षत्र असून पूजेचा मुहूर्त देखील आहे. परंतु बाळ गोपाळांचा जन्म हा रात्री झाल्यामुळे या वर्षी 6 सप्टेंबरला मथुरेत जन्माष्टमी साजरी होणार आहे.

  • 7 सप्टेंबर 2023 रोजी गोपाळकाला अर्थात दहीहंडीचा (Dahi handi) उत्साह सर्वत्र पाहायला मिळेल.

Janmashtami 2023 Date
Hibiscus Hair Pack : कोंड्याच्या समस्येपासून त्रस्त आहात? जास्वंदीचा हेअर पॅक लावून पाहाच, मिळतील अनेक फायदे

3. जन्माष्टमी 2023 पूजा मुहूर्त

  • 6 सप्टेंबर 2023, रात्री 11.57 - 07 सप्टेंबर 2023, 12:42 am

  • पूजेचा कालावधी - 46 मिनिटे

  • मध्यरात्री पूजा वेळ - 12.02 am

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com