

हिवाळ्यात कोरडी त्वचा असणाऱ्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सतत स्कीन ऑयली ठेवण्याचा प्रयत्न करुनही स्कीन ड्रायच राहते. मात्र फेब्रुवारी महिन्यात थंडीचे प्रमाण कमी होते. मात्र या दिवसात लोक स्वच्छतेचा आळशीपणा करणं थांबवत नाहीत. याने स्कीनवर कोणत्याही भागात खाज सुटते आणि लहान लहान जखमा होतात. आपण या समस्या अजिबात गांभीर्याने घेत नाहीत. पण तज्ज्ञ म्हणतात, शरीरावर येणारी सततची खाज ही कॅन्सरची प्रमुख लक्षणे असू शकतात.
मुळात त्वचेवर खाज येणं ही सामान्य समस्या आहे. अॅलर्जी, कोरडी त्वचा, डास चावणं किंवा हवामानाच्या बदल यामुळे अनेकदा खाज येते आणि काही दिवसांत ती आपोआप कमी होते. मात्र काही लोकांमध्ये ही खाज आठवडे किंवा महिनाभर राहते. सहा आठवड्यांपेक्षा जास्त दिवस टिकणाऱ्या खाजेला ‘क्रॉनिक प्रुरायटस’ असं तज्ज्ञ म्हणतात.
विशेषतः रक्ताशी संबंधित काही कॅन्सरमध्ये खाज येण्याचं प्रमाण जास्त आढळतं. लिम्फोमा हा त्यापैकी एक महत्त्वाचा कॅन्सर आहे. यामध्ये त्वचेवर सतत खूप तीव्रपणे खाज सुटते. याशिवाय ल्युकेमिया, विशेषतः क्रॉनिक ल्युकेमियाच्या रुग्णांमध्येही खाजेची तक्रार दिसते. पॉलीसायथीमिया व्हेरा या रक्ताच्या आजारात अंघोळीनंतर अचानक खाज येते, ज्याला ‘अक्वाजेनिक इच’ असं म्हटलं जातं, आणि काही प्रकरणांमध्ये पुढे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
ब्लड कॅन्सरव्यतिरिक्त लिव्हरचा कॅन्सर, पित्तनलिकेचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर (Pancreatic Cancer) , फुफ्फुसाचा कॅन्सर तसेच पोटाच्या कॅन्सरच्या प्रगत अवस्थेतही खाज येते. स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये पित्तनलिका अडकल्याने कावीळ होते आणि त्यामुळे संपूर्ण शरीरावर खाज येते.
खाज शरीराच्या कुठल्याही भागावर येऊ शकते, पण अनेकदा छाती, पोट, पाठ आणि पायांवर जास्त जाणवते. खाज सौम्यही असू शकते किंवा इतकी तीव्र की झोप आणि दैनंदिन आयुष्य विस्कळीत होऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे, फक्त खाज येते म्हणून कॅन्सर आहे असं ठरवता येत नाही. मात्र खाजेसोबत वजन कमी होणं, ताप, रात्री घाम येणं, थकवा, भूक न लागणं, गाठी दिसणं किंवा कावीळ यांसारखी लक्षणं आढळत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.