Kidney: किडनी खराब होण्याची प्रमुख २ कारणे, तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती; वेळीच व्हा सावध

Blood Pressure Control: बदलत्या जीवनशैलीमुळे किडनीचे आजार वाढत आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही किडनी निकामी होण्यामागची प्रमुख कारणे असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
Kidney Failure Reasons
kidney damage causesgoogle
Published On

सध्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. लोक धावपळीमध्ये खूप थकतात. त्यामुळे त्यांना मिळेल त्या वेळेत आराम करणं हाच एक पर्याय सोपा वाटतो. पण यामुळे तुमच्या शरीरातील काही महत्वाचे अवयव खराब किंवा निकामी झाले तर? तुम्हाला भविष्यात मोठ-मोठ्या जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागेल.

यातच खाण्यापिण्याच्या, व्यायाम कमी करण्याच्या, आणि इतर वाईट सवयींच्या आहारी जाण्यामुळे तुमच्या किडनीला मोठा फटका बसतो. त्याने किडनी योग्यरित्या काम करु शकत नाही. अशी महत्वाची कारणं किंवा आजार आहेत ज्याने तुमची किडनी निकामी होऊ शकते. पुढील लेखात याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. याचा वापर करुन तुम्ही वेळीच उपचार घेऊ शकता.

Kidney Failure Reasons
Skin Itching Symptoms: कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे खाज सुटते? यावर उपाय काय? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

किडनी खराब होण्याची मुख्य कारणे

जगभरात किडनी निकामी होण्यामागे डायबेटीज (Diabetes)आणि उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही दोन प्रमुख कारणं मानली जातात. दीर्घकाळ रक्तातल्या साखरेचं प्रमाण जास्त राहत असेल तर किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना इजा होते. त्याने हे प्रथिने लघवीत जातात, यालाच ‘प्रोटीनयुरिया’ म्हणतात. ही किडनी आजाराची सुरुवातीची लक्षणं असतात. डायबेटीज असलेल्या रुग्णांना पुढे जाऊन क्रॉनिक किडनी डिसीजचा धोका असतो.

हाय ब्लड प्रेशर

हाय ब्लड प्रेशरमुळेही किडनीमधील नाजूक रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. याने किडनी नीट काम करू शकत नाही आणि शरीरात विषारी घटक आणि पाणी साचायला लागतं. त्यामुळे रक्तदाब आणखी वाढतो आणि किडनीचं नुकसान होत जातं.

इतर कारणे

किडनीला इजा होण्यामागे सतत युरीन इन्फेक्शन होणं, किडनी स्टोनमुळे होणारा त्रास, औषधांचे जास्त सेवन, कॅन्सरची औषधे, ऑटोइम्यून आजार, आनुवंशिक विकार, वजन वाढ आणि हृदयविकार यांचा किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Kidney Failure Reasons
Chanakya Niti: या 5 चुकांमुळे पुरुष होतात उद्ध्वस्त, संसारही टिकत नाही; चाणक्यांनी काय दिला सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com