Sakshi Sunil Jadhav
गुरु आचार्य चाणक्य हे राजनिती आणि अर्थशास्त्राचे मोठे हुशार गुरु होते. तसेच त्यांनी जीवनातल्या संघर्षावर आपण कशापद्धतीने मात द्यावी हे सुद्धा सांगितले आहे.
चाणक्य नीतीनुसार, पत्नीचा अपमान करणाऱ्या पुरुषाच्या घरात सुख आणि शांती कधीच टिकत नाही, असं चाणक्य स्पष्ट सांगतात.
परिस्थिकडे आकर्षित होणारा पुरुष स्वतःचा आणि कुटुंबाचा नाश स्वतःच करतो, असं चाणक्य नीतीत सांगितले आहे.
पत्नी ही फक्त जबाबदार नसून आयुष्यातली सगळ्यात मोठी साथीदार आहे. तिचे मत दुर्लक्षित करणारा पती स्वतःच घराची पायाभरणी कमकुवत करतो.
पतीचं कर्तव्य आहे की तो पत्नीला सुरक्षित वातावरण देणं. यात अपयशी ठरणारा पुरुष आपल्या मूर्खपणामुळे संसार उद्ध्वस्त करतो.
चाणक्यांच्या मते, संयम, धर्मनिष्ठा आणि जबाबदारी हे यशस्वी पतीचे गुण आहेत. या गुणांचा अभाव घरात वाद निर्माण करतो.
विनाकारण खर्च करणारा, आर्थिक शिस्त न पाळणारा पुरुष संसाराची आर्थिक मुळं कमकुवत करतो, असे चाणक्य सांगतात.
पत्नीचा सन्मान न करणारा, तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करणारा पुरुष लवकर अपयशी ठरतो, असं चाणक्य स्पष्ट सांगतात.
चाणक्यांच्या मते, पत्नीचा आदर, चारित्र्य, संयम, आर्थिक जबाबदारी आणि धर्मनिष्ठा हेच यशस्वी संसाराचे खरे गमक आहे.