Sakshi Sunil Jadhav
व्हॅलेंटाईन्स डे निमित्त कपल्ससाठी मुंबईतच एक सुंदर, शांत आणि बजेट-फ्रेंडली ठिकाण आहे. विक्रोळीतील चेरी ब्लॉसम प्लेस. जपानमधील साकुरा फुलांची आठवण करून देणाऱ्या या गुलाबी फुलांच्या बहरामुळे हे ठिकाण सध्या चर्चेत आहे.
मुंबईच्या विक्रोळी परिसरात असलेले हे ठिकाण रेल्वे ट्रॅकजवळील आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या जवळ आहे. स्थानिक नागरिकांमध्ये हे ठिकाण पिंक ब्लॉसम झोन म्हणूनही ओळखलं जातं.
विक्रोळी रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण साधारण १.५ ते २ किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशनवरून ऑटो, बस किंवा चालतही तुम्ही येथे जावू शकता.
तुम्हाला इथे झाडांवर फुलणारी गुलाबी रंगाची फुलं पाहिल्यावर जणू जपानमधील चेरी ब्लॉसमचं दृश्य डोळ्यांसमोर येईल . फेब्रुवारी-मार्च महिन्यात इथलं सौंदर्य जास्त खुलतं.
शांत वातावरण, हिरवळ आणि गुलाबी फुलांचा बहरामुळे हे ठिकाण कपल्ससाठी परफेक्ट रोमँटिक स्पॉट ठरत आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या आसपास येथे फोटोशूटसाठीही गर्दीही वाढते.
लोकल ट्रेनचं तिकीट, स्टेशनपासून ऑटो किंवा बस सगळं मिळून साधारण १०० रुपयांत ही छोटी रोड ट्रिप पूर्ण होऊ शकते. त्यामुळे बजेट ट्रॅव्हलर्ससाठी हा उत्तम पर्याय आहे.
इंस्टाग्राम रील्स, प्री-वेडिंग फोटो, कपल फोटोजसाठी हे ठिकाण सध्या ट्रेंडमध्ये आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी गोल्डन अवरमध्ये फोटो काढणं जास्त सुंदर ठरतं.
सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ५ नंतरची वेळ सर्वोत्तम मानली जाते. उन्हाळ्यात दुपारी जाणं टाळलेलं बरं.