Blood Pressure: BP नॉर्मल असूनही वाढतो हार्ट ब्लॉकेजचा धोका, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Heart Blockage Risk: नॉर्मल BP असूनही हृदयात ब्लॉकेज होऊ शकते. कोलेस्टेरॉल साठा, ताण आणि जीवनशैली कारणीभूत ठरतात. वेळेवर ECG, अँजिओग्राफीसारख्या चाचण्या करून गंभीर धोका टाळता येतो.
normal BP heart disease
heart blockage riskgoogle
Published On

सध्या वाढत्या ताणाचा परिणाम अनेकांच्या ह्रदयावर होतो, मग त्यांना काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. अर्थात ही समस्या काही एका रात्रीत उद्भवणारी नाही. तुम्ही जर याची लक्षणं वेळीच उपचार केलेत तर तुम्हाला याच्यामुळे निर्माण होणाऱ्या जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही. त्यात बऱ्याच जणांचा समज असतो की, हृदयविकार हा फक्त BP वर अवलंबून असतो. पण याची अनेक कारणं आहेत.

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्हाला तुमचे ब्लड प्रेशर नॉर्मल वाटतं, तेव्हा सुद्धा ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असू शकतात. याचं मुख्य कारण म्हणजे कॉलेस्टेरॉल, फॅट आणि कॅल्शियम यांच्या साचल्यामुळे तयार होतं. या प्रक्रियेला वेळ लागतो. तर याची लक्षणंही दिसत नाहीत. पण अनेकांना हाच प्रश्न पडतो की, हृदयात ब्लॉकेज ( Heart Blockage) आहे का कसं ओळखायचं? चला थोडक्यात जाणून घेऊयात.

normal BP heart disease
Ujani Dam Tourism: सोलापूरजवळ आहेत ६ सुंदर थंड हवेची ठिकाणं; निसर्गाच्या सानिध्यात जाऊन विसराल ऑफिसचं सारं टेन्शन

तज्ज्ञांच्या मते, तुम्हाला यासाठी टप्प्याटप्प्याने काही टेस्ट कराव्या लागू शकतात. ECG ही पहिली टेस्ट असेल. त्याने ह्रदयावर ताण आहे का? हे कळतं. ट्रेडमिल टेस्टमुळे व्यायाम करताना हृदय कसं काम करतं हे समजतं, तर 2D इकोमुळे हृदयाच्या स्नायूंची हालचाल कळते.

तसेच CT कोरोनरी अँजिओग्राफीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे का? हे स्पष्ट कळतं. कोरोनरी कॅल्शियम स्कोअरमुळे सुरुवातीच्या टप्प्यातील समस्या ओळखता येते. तर कोरोनरी अँजिओग्राफी ही सर्वात अचूक चाचणी मानली जाते.

डायबेटीज, कोलेस्टेरॉल, धूम्रपान, लठ्ठपणा किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असलेल्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ४० वर्षांनंतर नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. हृदयातील ब्लॉकेज हळूहळू वाढतं आणि सुरुवातीला लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे वेळेवर तपासणी आणि जीवनशैलीत बदल केल्याने मोठा धोका टाळता येतो.

डिस्क्लेमर: कोणतीही चाचणी किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. साम टिव्ही याच्याशी सहमत नाही. शिवाय आहारातील बदल हे डॉक्टरांच्याच सल्ल्याने करावेत.

normal BP heart disease
Jio Recharge: खुशखबर! Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; सोबत अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा, वाचा किंमत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com