Social Media Ban : अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? सरकारनं उचललं महत्वाचं पाऊल

social media ban minor : अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी येणार का? महाराष्ट्र सरकारने टास्क फोर्स स्थापन करून अभ्यास सुरू केला. मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा घेतला आढावा.
Social Media
Social MediaSaam TV
Published On

Is social media banned for kids in India? : भारतात अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात येतेय.... अशातच राज्य आणि केंद्र सरकारनं सोशल मीडिया बंदीसाठी काय हालचाली सुरु केलेत? सोशल मीडियाच्या व्यसनामुळे अल्पवयीन मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

मोबाईल स्क्रीनवर खिळलेली नजर, तासनतास चालणारे रिल्स आणि आभासी जगातील लाईक्सचा हव्यास... हे चित्र आज प्रत्येक घरात पाहायला मिळतं...मात्र हेच सोशल मीडिया आता आपल्या लहान मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी 'स्लो पॉयझन' ठरतयं... त्यामुळे याचं संभाव्य धोक्याची दखल आता महाराष्ट्र सरकारनं घेतलीय....18 वर्षाखालील 4 कोटी मुलांच्या सोशल मीडिया वापराचा अभ्यास करण्यासाठी राज्यानं ट्रास्क फोर्सची स्थापना केलीय...हे ट्रास्क फोर्स पुढील 3 महिन्यात मुलांवरील सोशल मीडियाच्या परिणामाचा अभ्यास करेल आणि त्यानंतर योग्य त्या उपाययोजना सुचवेल...

Social Media
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ₹४५००; 'हे' आहे कारण, वाचा लेटेस्ट अपडेट

तर दुसरीकडे केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानंही मुलांच्या सोशल मीडिया वापरासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससोबत चर्चा सुरू केलीय. सायबर बुलिंग, चुकीची माहिती आणि सोशल मीडियाच्या व्यसनामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याची चिंता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं व्यक्त केलीय.

Social Media
पेट्रोल डिझेल तुटवडा, पंपांवरच्या लांबलचक रांगा...CM फडणवीसांनी दिला थेट इशारा अन् सांगितलं महाराष्ट्राचं वास्तव

त्यामुळे भारतात ही ऑस्ट्रेलियाप्रमाणे 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा विचार सुरु आहे... मात्र सोशल मीडिया कंपन्यांच्या मते, समाजमाध्यमांवरील पूर्ण बंदीमुळे मुले बेकायदेशीर चॅनेलकडे वळू शकतात. त्याऐवजी अधिक कडक सुरक्षा उपाय लागू करणे योग्य ठरेल. त्यामुळे केंद्र सरकार 13 ते 16 वयोगटातील मुलांच्या सोशल मीडिया वापराचा अभ्यास करून बंदीचा निर्णय जाहीर करेल.

Social Media
FD fraud : आणखी एका बँकेत महाघोटाळा, एफडीचे १६० कोटी लाटले, धक्कादायक प्रकरण उघड

सध्या देशात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आलीय... मात्र संपूर्ण देशात अशा पद्धतीची बंदी लागू करण्याआधी 'डिजिटल डिटॉक्स'साठी पालकांचा पुढाकारही तितकाच महत्त्वाचा आहे. तसचं कंपन्यांनाही मुलांच्या वयाची खात्री करण्यासाठी कडक 'एज व्हेरिफिकेशन'ची यंत्रणा राबवावी लागेल.. महिन्याभरापूर्वी गाजियाबादमध्ये ३ सख्या बहिणींनी ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन केलेली आत्महत्या ही सोशल मिडीया लहानग्यांच्या गळ्यातील कसा फास ठरतोय हे सांगण्यास पुरेशी आहे. अशावेळी सरकारी यंत्रणांसह पालकांनीही आपल्या मुलांवर वेळीच आवर घालायला हवा... अन्यथा आभासी जगाच्या कचाट्यातून लहानग्यांना बाहेर काढणं कठीण होईल.

Social Media
नोकरी सोडल्यानंतर फक्त ४८ तासात फुल अँड फायनल सेटलमेंट, नवीन कामगार कायद्यात काय काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com