Kotak Mahindra Bank FD scam Panchkula ₹160 crore details : कोटक महिंद्रा बँकेतील पंचकुला येथील एका ब्रँचमध्ये तब्बल १६० कोटींचा घोटाळा उघड झालाय. धक्कादायक म्हणजे, मुदत ठेव म्हणजेच एफडीमधील पैसे लाटल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट स्टेटमेंटचा वापर करत कोट्यवधींचा निधी लाटल्या प्रकरणी आज बँकेच्या माजी कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
बँकेतील फक्त एफडीमधील पैसे लाटल्याचा हा प्रकार नसून अनेकांची पूर्वनियोजत प्लान करून फसवणूक केलेला प्रकार असू शकतो, असा अंदाज तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एफडीचे पैसे लाटल्याचे समोर आल्यानंतर बँकिंग प्रणाली आणि सरकारी निधीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पंचकुला महानगरपालिकेने कोटक महिंद्रा बँकेकडे असलेल्या मुदत ठेव पावत्यांमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर बँकेकडून याबाबत पंचकुला पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तात्काळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू कऱण्यात आला होता. दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेने यात गुंतलेल्या रकमेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यता आलेली नाही. सध्या या प्रकऱणाचा कसून तपास करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचकुलातील कोटक महिंद्रा बँकेचे माजी रिलेशनशिप मॅनेजर दिलीप कुमार राघव यांच्यावर मुख्य आरोपीसोबत मिळून संपूर्ण कट रचल्याचा आरोप आहे. पंचकुला महानगरपालिकेने जमा केलेली मोठी रक्कम सुरक्षित एफडीमध्ये ठेवण्याऐवजी बनावट खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली. त्यानंतर पंचकुला महानगरपालिकेला संशय येऊ नये, त्यासाठी वारंवार खोटी निवेदने आणि कागदपत्रे देण्यात आली. कागदोपत्री सर्व काही अचूक असल्याचे भासवण्यात आले. ज्यामुळे बराच काळ कोणालाही संशय आला नाही. पण हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.