

Maharashtra fuel shortage news today : राज्यात पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरसाठी लांबलचक रांगा लागल्या आहेत. आखाती देशातील युद्धामुळे देशात इंधानाचा तुटवडा होणार असल्याचे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली अन् पंपांवर रांगा लागल्या, गॅस एजन्सीबाहेरही गर्दी होऊ लागली. त्यावर आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे. देशात मुबलक इंधन साठा असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहेच. पण राज्यात नेमकी स्थिती काय आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस रामनवमी निमित्त नागपूरमध्ये होते, त्यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.
केंद्र सरकारने वारंवार पुरेसं पेट्रोल डिझेल असल्याचं सांगितलं आहे.तरी सुद्धा अनेक शहरांमध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकच पेट्रोल भरून घेत आहे. अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते.डिमांड आणि सप्लायवर ताण येतो. त्यावेळेस अनेक अडचणी निर्माण होतात. दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा जेवढा स्टॉक लागतो तेवढा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही रांगा लावू नये, अशी महाराष्ट्रातील सर्वाना विनंती करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याशिवाय पेट्रोल पंपावर काळाबाजार करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा इशाराही त्यांनी दिला.
DAP खताचा काळाबाजार केला जात असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, मागील तीन दिवसाचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये डीएपीची विक्री 70% ने वाढली आहे. लोक घाबरून खरेदीसाठी गर्दी करत आहेत. आपल्याकडे मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे, त्यामुळे कुणीही अतिरिक्त खरेदी करून ठेऊ नये, असे फडणवीस यांनी आवाहन केले. पुरवठादार यांनी सुद्ध शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला फौजदारी कारवाई केल्या जाईल असा इशाराही दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.