Drinking Cold Water During Monsoon
Monsoon Health CareSAAM YV

Monsoon Health Care : तुम्ही सुद्धा पावसाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी घटाघट पिताय? वेळीच व्हा सावध! नाहीतर...

Drinking Cold Water During Monsoon : अनेकांना पावसाळ्यात देखील फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र पावसाळ्यात बाहेरून आल्यावर फ्रिजमधील थंड पाणी घटाघट प्यायल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात.
Published on

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. पण पावसाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. पावसाळ्यात दमट हवामानामुळे थंड पाणी प्यावेसे वाटते. पण ते पिणे आरोग्यास घातक ठरते. पावसाळ्यात बाहेरून आल्यावर घटाघट पाणी प्यायल्याने अनेक समस्या निर्माण होतात.

पावसाळ्यात फ्रिजचे थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम

  • पावसाळ्यात थंड पाणी प्यायल्याने घशाला संसर्ग होऊ शकतो. यामुळे घसा खवखवतो आणि सर्दी होते.

  • पावसाळ्यात थंड पाणी प्यायल्याने पचन संस्थेवर परिणाम होऊन पचनक्रिया मंदावते.

  • पावसाळ्यात बाहेरून आल्यावर फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने रक्ताभिसरणात अडथळे येतात.

  • पावसाळ्यात आधीच तापमानात थंडावा असतो. त्यात जर तुम्ही अजून थंड पाणी प्यायल्याने शरीरातील तापमानावर परिणाम होतो.

  • थंड पाणी पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते. ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

  • पावसाळ्यात थंड पाणी प्यायल्याने वारंवार तहान लागते.

Drinking Cold Water During Monsoon
Dry Fruits Benefits : पावसाळ्यात चांगलं आरोग्य हवंय? मग दररोज खा भिजवून 'हे' ड्रायफ्रुट, आजार जातील पळून

पावसाळ्यात पाणी पिताना 'अशी' घ्या काळजी

  • पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता असल्यामुळे थंड पाणी पिणे टाळा. कारण त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकता.

  • पावसाळ्यात कधीही उकळवून कोमट केलेले पाणी प्यावे.

  • पावसाळ्यात आधीच पचनक्रिया मंदावते. अशात कोमट पाण्यामुळे पोटाला आराम मिळतो.

  • पावसाळ्यात सर्दी, खोकला , घशाला संसर्ग होतो. यामुळे पाणी पिणे राहणे गरजेचे असते.

  • पावसाळ्यात कधीही पाणी जास्त वेळ साठवून ठेवू नये. नेहमी फ्रेश पाणी प्यावे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Drinking Cold Water During Monsoon
Children Health : हडकुळी मुलं होतील धष्टपुष्ट, रोज सकाळी खा 'हा' पौष्टीक लाडू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com