Dry Fruits Benefits : पावसाळ्यात चांगलं आरोग्य हवंय? मग दररोज खा भिजवून 'हे' ड्रायफ्रुट, आजार जातील पळून

Soaked Cashew Benefits : पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. यामुळे आपल्या डाएटमध्ये ड्रायफ्रुट्सचा समावेश करावा.
Soaked Cashew Benefits
Dry Fruits BenefitsSAAM TV
Published On

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करावा. नियमित सकाळी उठल्यावर भिजवलेले काजू खावे. भिजवलेल्या काजूमध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन यांचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपले आरोग्य पावसाळ्यात तंदुरुस्त राहण्यास मदत करते.

हृदयाचे आरोग्य

भिजवलेले काजू हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. हृदयासाठी उपयुक्त असलेल्या पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स उत्तम स्रोत आहे. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

मजबूत हाडे

भिजवलेले काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशिअम यांचे प्रमाण जास्त असते. यामुळे रोज रात्री काजू पाण्यामध्ये भिजवत ठेवा आणि सकाळी त्यांचे सेवन करा. यामुळे स्नायूंचे दुखणे देखील कमी होते. भिजवलेले काजू व्हिटॅमिन डी चा उत्तम स्रोत आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

भिजवलेल्या काजूमध्ये व्हिटॅमिन ई असते. जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

वजन कमी

लठ्ठपणामुळे वैतागला असाल तर, नियमित पाण्यात भिजवून काजू खा. कारण यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. जे वजन कमी करण्यास मदत करते.

पचन सुरळीत

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम भिजवलेले काजू खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. तसेच पोट जास्त काळ भरलेले राहते. यातील फायबरचे पोषक घटक ॲसिडीटी पासून आपले संरक्षण करतात. छातीतील जळजळ देखील कमी होते.

Soaked Cashew Benefits
Diabetes : 'हा' हलका-फुलका पदार्थ मधुमेह ठेवेल नियंत्रणात, नाश्त्याला आवर्जून खा

मेंदूचे आरोग्य

काजूमधील अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म मेंदूचे कार्य उत्तम ठेवण्यास मदत करतात. मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.

त्वचेचे आरोग्य

भिजवलेले काजू मधील घटक त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात. काजूमुळे कोलेजन उत्पादन वाढते. त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून होणारे नुकसान टळते आणि अकाली वृद्धत्वापासून संरक्षण मिळते.

मधुमेह

काजूमधील ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या डाएटमध्ये याचा समावेश करावा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Soaked Cashew Benefits
Skincare Tips : तुमच्या सौंदर्यात भर घालणार फाटलेले दुधाचे पाणी, वाचा भन्नाट फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com