Spoiled Milk Water Benefits
Skincare TipsSAAM TV

Skincare Tips : तुमच्या सौंदर्यात भर घालणार फाटलेले दुधाचे पाणी, वाचा भन्नाट फायदे

Spoiled Milk Water Benefits : दूध गरम करताना दूध फाटल्यास ते फेकून न देता, फाटलेले दुधाचे पाणी चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोगात आणावे. यामधील पोषक घटक चेहरा निरोगी ठेवतात.
Published on

पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण दमट वातावरणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या आणि मुरूमांचे प्रमाण वाढते. अशावेळी फाटलेल्या दुधाचे पाणी चेहऱ्यावर चमक टिकवून ठेवण्यास मदत करते. दुधामधील कॅल्शियम त्वचा तजेलदार ठेवते. त्यामुळे यापुढे दूध फाटल्यानंतर फेकून न देता त्यांच्या पाण्याचा त्वचेचे सौंदर्य वाढवण्यात वापर करावा.

फाटलेल्या दुधाचे पाणी

निस्तेज झालेली त्वचा तेजस्वी आणि हायड्रेट बनवण्यासाठी फाटलेल्या दुधाचे पाणी उपयोगात येते. फाटलेले दूध गाळून त्याचे पाणी काढून घ्यावे. या पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यास चेहऱ्यावरील धूळ आणि माती निघून जाऊन चेहरा उजळ होतो. तसेच चेहऱ्याचा पोत सुधारतो. फाटलेल्या दूधाच्या पाण्यातील मायक्रोबियल गुणधर्म त्वचेची पीएच पातळी सुधारण्यास मदत करतात.

केसांचे आरोग्य

पावसाळ्यात केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी केसांना शाम्पू केल्यावर कंडिशनरच्या जागी दुधाच्या पाण्याने केस ओले करावे. ५ ते १० मिनिटांनी कोमट पाण्याने केस स्वच्छ करावे.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फाटलेल्या दुधाचे पाणी उपयुक्त ठरते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

वजन नियंत्रणात

वजन कमी करण्यासाठी फाटलेल्या दुधाच्या पाणे उपयुक्त ठरते. तुम्ही व्यायाम केल्यावर या पाण्याचे सेवन करू शकता. तसेच यामध्ये कॅलरीचे प्रमाणही कमी असते.

Spoiled Milk Water Benefits
Dessert Recipes: सकाळी चहा बनवताना दूध फाटलं? नो टेन्शन! झटपट बनवा डेझर्ट, वाचा रेसिपी

स्नायूंचे आरोग्य

फाटलेल्या दुधाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. यांच्या सेवनामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. हाडांची ताकद वाढते.

फाटलेल्या दुधाच्या पाण्याचे इतर फायदे

  • फाटलेल्या दुधाच्या पाण्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्यूस पिताना त्यामध्ये हे पाणी घालावे.

  • कणीक मऊ होण्यासाठी ती पाण्यात मळण्या ऐवजी फाटलेल्या दुधाच्या पाण्यामध्ये मळावी. यामुळे चपाती छान फुलेल.

  • भाजीच्या ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये फाटलेल्या दुधाचे पाणी मिसळा. यामुळे पदार्थाला जास्त स्वाद येईल.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Spoiled Milk Water Benefits
Skin Care Tips : 'या' फळभाजीत दडलंय सुंदर त्वचेचे रहस्य, अवघ्या १० मिनिटांत चेहरा दिसेल उजळ अन् तजेलदार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com