उन्हाळ्यात आपल्याला आरोग्यासोबतच आहाराची देखील काळजी घ्यायला हवी. वाढत्या उष्णतेमुळे आपल्याला डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे या काळात आपल्याला ऊन लागणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, उलटी, थकवा यांसारख्या आजारांना आपण बळी पडतो.
उन्हाळ्यात (Summer Season) आपण डिहायड्रेशनच्या समस्येला वारंवार बळी पडतो. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास आपल्या या समस्येला सामोरे जावे लागते. हवामान खात्याने यावेळी एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेचा पार अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
उष्मघातामुळे अनेक आजार (Disease) बळवू शकतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शरीराला हायड्रेच ठेवण्याचा चांगला पर्याय काकडीसह आहारात काही फळे आणि भाज्यांचा समावेश करा. काकडीला उन्हाळ्यात सूपरफूड मानले जाते. यामध्ये पाण्यासोबत भरपूर पोषक तत्वे आढळतात. याचा आहारात सॅलडसोबत ज्यूस म्हणूनही वापर करता येईल. यासाठी तुम्ही काकडी-पुदिन्याचा रस बनवून पिऊ शकता.
काकडी-पुदिन्याचे हायड्रेटिंग ड्रिंक कसे बनवाल?
काकडी सालीसोबत खाल्ल्याने आरोग्याला (Health) अधिक फायबर मिळतात.
काकडी चिरुन मिक्सरमध्ये टाका. पुदिन्याची पाने घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक करा.
बारीक झाल्यावर गाळून ग्लासमध्ये काढा, ग्लासमध्ये काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला. आणि सर्व्ह करा काकडी-पुदिन्याचे टेस्टी ड्रिंक
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.