Dessert Recipes: सकाळी चहा बनवताना दूध फाटलं? नो टेन्शन! झटपट बनवा डेझर्ट, वाचा रेसिपी

Kesar Peda Recipes: अनेक वेळा चहा करताना किंवा दूध तापवत असताना अचानक फुटते. अशावेळी फाटलेले दूध वाया न घालवता त्यापासून तुम्ही जेवल्यानंतर डेझर्टसाठी केसर पेढा बनवू शकता. सोपी रेसिपी जाणून घ्या.
Kesar Peda
Dessert RecipesSAAM TV
Published On

बऱ्याच वेळा सकाळी चहा करताना दूध फाटते. अशावेळी एवढ्या दुधाचे करायचे काय? असा प्रश्न महिलांना पडतो. तर मग आता हे टेन्शन सोडा आणि झटपट केसर पेढा बनवा. दूध आणि केसर दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केसरमध्ये कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे तुमचे आरोग्य आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

केसर पेढा

साहित्य

कृती

केसर पेढा बनवण्यासाठी सर्वप्रथम खराब झालेले दूध मंद आचेवर गरम करून घ्या. दूध सतत ढवळत रहा त्यामुळे दूध पॅनच्या तळाशी चिकटणार नाही. दूध जसे घट्ट होत जाईल तसे मलईदार होईल. आता दुधात साखर घाला आणि विरघळेपर्यंत ढवळत रहा. दुसरीकडे कोमट दुधामध्ये भिजवलेले केशर फाटलेल्या दुधामध्ये टाका. थोडी वेलची पूड घालून सर्व मिश्रण एकजीव करू घ्या. आता या मिश्रणात तूप घाला. यामुळे मिश्रण घट्ट होईल आणि पॅनला चिकटणार नाही. थोड्या वेळाने गॅस बंद करा. आता हाताला तेल ला‌वून दुधाच्या सारणाचे गोळे करून घ्या आणि मग त्यांना पेढ्याचा आकार द्या. पेढ्यावर कापलेले ड्रायफ्रूट्स लावा. काही काळ हे पेडे फ्रिजमध्ये ठेवा. पेढे थोडे कडक झाल्यावर दुपारचे जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून खा.

Kesar Peda
Poha Pakoda Recipe: सतत नाश्त्याला कांदे पोहे खाऊन आलाय वैताग? ट्राय करा झटकेपट बनणारे चविष्ट पकोडे, रेसिपी बघा

दूध आणि केशराचे फायदे

  • केशर आणि दुधामुळे आपली स्मरणशक्ती वाढते.

  • एखाद्य पदार्थामध्ये केशर घातल्यास त्यात पदार्थाची चव आणखी वाढते.

  • नियमित केशर खाल्याने दम्याचा त्रास दूर होतो.

  • पोटदुखी, ॲसिडीटीवर केशरचे दूध रामबाण उपाय आहे.

  • रात्री झोपताना केशरचे दूध पिल्याने शांत झोप लागते.

  • त्वचेवरील सुरकुत्या आणि पिंपल्स दूर करून केशर त्वचा मऊ आणि तजेलदार करते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Kesar Peda
Rava Cake Recipe : बेकरी स्टाईल जाळीदार आणि मऊ केक; घरच्याघरी कुकरमध्ये कसा बनवायचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com