Skin Care Tips : 'या' फळभाजीत दडलंय सुंदर त्वचेचे रहस्य, अवघ्या १० मिनिटांत चेहरा दिसेल उजळ अन् तजेलदार

Bottle Gourd Peel : पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी चेहऱ्याचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि त्वचा तजेलदार बनवण्यासाठी दुधी भोपळा रामबाण उपाय आहे.
Bottle Gourd Peel
Skin Care TipsSAAM TV
Published On

शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे चेहऱ्याचे आरोग्य धोक्यात येते. अशात घरच्या घरी त्वचेची काळजी घेण्यासाठी रोजच्या आहारातील दुधी भोपळा मदत करेल. आयुर्वेदात दुधी भोपळ्याला खूप महत्त्व आहे. यात कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आढळतात. जे तुमचे त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात.

टॅनिंग दूर

दुधी भोपळ्यामधील अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म काळवंडलेला चेहऱ्याची चमक पुन्हा घेऊन येण्यास मदत करतो. यामुळे मोठ्या प्रमाणात टॅनिंगची समस्या दूर होते. त्वचेवर कमी वेळात ग्लो आणण्यासाठी दुधी भोपळा रामबाण उपाय आहे. दुधी भोपळ्याचे सालं काढून तुम्ही त्वचेवर चोळल्यास त्वचेवरील टॅनिंग कमी होते. किंवा काळपट भाग निघून जातो. शरीराला जळजळ होत असल्यास पाय किंवा पायांच्या तळव्यावर दुधी भोपळ्याचे सालं चोळा. यामुळे उष्णता निमार्ण होऊन शरीराची जळजळ थांबेल.

Bottle Gourd Peel
Skin Care : चेहऱ्यावरील अ‍ॅकने आणि पिंपल्स मिनिटांत होतील गायब; ट्राय करा कडुलिंबाच्या पाल्याचा 'हा' रामबाण उपाय

दुधी भोपळ्याच्या सालीचा फेसपॅक

साहित्य

  • दुधीची सालं

  • दुधाची साय

  • गुलाबपाणी

  • हळद

  • कोरफड गर

कृती

दुधी भोपळ्याच्या सालीचा फेसपॅक बनवण्यासाठी एका भांड्यात दुधी भोपळ्याची साल किसून घ्यावी. त्यानंतर यामध्ये थोडे गुलाबपाणी, दुधाची साय, हळद, कोरफड गर टाकून पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा तजेलदार होईल. आठवड्यातून दोन वेळा हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याचा पोत सुधारेल. चेहऱ्याला फेसपॅक लावण्याआधी त्याची पॅचटेस्ट आवर्जून करा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Bottle Gourd Peel
Monsoon Skin Care : पावसाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी 'या' गोष्टी न विसरता करा अन् चेहऱ्याचे सौंदर्य खुलवा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com