Monsoon Skin Care : पावसाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी 'या' गोष्टी न विसरता करा अन् चेहऱ्याचे सौंदर्य खुलवा

Healthy Skin : पावसाळ्यात त्वचेच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसात त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते. याबाबत त्वचा तज्ज्ञांचे मत जाणून घेऊयात.
Healthy Skin
Monsoon Skin CareSAAM TV
Published On

पावसाळ्यात पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासोबतच त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे त्वचेवर परिणाम होतो. यामुळे पावसाळ्यात त्वचेवर विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी त्वचा तज्ज्ञ डॉ.अश्विनी प्रमोद जाधव यांनी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि अशाप्रकारे त्वचेची काळजी घ्या.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

स्वच्छता

मान्सूनमध्ये त्वचेला स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील घाण आणि तेल निघून जाईल आणि त्वचा तजेलदार होईल.

मॉइश्चराइज

पावसाळ्यात त्वचेला नियमित मॉइश्चराइज करणे खूप गरजेचे आहे. पावसाळ्यात विशेषताः वॉटर-बेस्ड मॉइश्चराइजरचा वापर करा. यामुळे त्वचा ताजीतवानी राहिली.

सनस्क्रीन

उन्हाळ्यात फक्त सनस्क्रीनचा वापर करू नये तर चांगल्या त्वचेसाठी पावसाळ्यातही सनस्क्रीनचा वापर करावा. पावसाळ्यातही काही प्रमाणात सूर्यप्रकाश येतो. त्यामुळे सूर्यकिरणांपासून त्वचेची हानी होऊ नये म्हणून पावसात देखील सनस्क्रीन लावा.

शरीर हायड्रेट ठेवा

पावसाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि योग्य आहार घेणे गरजेचे असते. तसेच नियमित फळांचा देखील आहारात समावेश करून घ्यावा. यामुळे त्वचा स्वस्थ राहील.

Healthy Skin
Banana Peel Benefits: डोळ्यांखालील काळी वर्तुळे मिनिटांत होतील गायब, वाचा केळीच्या सालीचे भन्नाट फायदे

मास्क आणि स्क्रब

पावसाळ्यात विविध पौष्टिक फळांपासून तुम्ही घरगुती मास्क आणि स्क्रब बनवू शकता. याचा नियमित वापर केल्यास चेहऱ्याचे तारुण्य दीर्घकाळ टिकते. स्क्रबमुळे त्वचेला पोषण मिळून मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.

ग्लिसरीन आणि गुलाबपाणी

रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून समप्रमाणात ग्लिसरीन आणि गुलाबपाणी एकत्र करून चेहर्‍यावर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.

ओलसर कपड्यांपासून दूर रहा

पावसाळ्यात ओलसर कपड्यांपासून दूर रहा. कारण यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. कपडे नेहमी कोरडे करूनच घालावे.

Healthy Skin
Beauty Tricks : न वापरलेले ब्‍युटी प्रोडक्‍ट फेकू नका, 'असा' करा पुनर्वापर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com