Makeup Products Hacks
Beauty Tricks SAAM TV

Beauty Tricks : न वापरलेले ब्‍युटी प्रोडक्‍ट फेकू नका, 'असा' करा पुनर्वापर

Makeup Products Hacks : प्रत्येक स्त्रीला सुंदर आणि स्टायलिश दिसायला आवडते. यासाठी ती अनेक सौंदर्य प्रसाधनं खरेदी करते. पण कालांतराने हे प्रोडक्‍ट तसेच पडून राहतात. हे प्रोडक्‍ट्स वाया जाऊ नये म्हणून 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा.
Published on

सौंदर्य प्रसाधने हा महिलेच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. कारण प्रत्येक महिलेला सुंदर दिसायचे असते आणि त्यासाठी ती अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करते. यामुळे स्त्रियांचे सौंदर्य देखील खुलून येते. मेकअप हे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. त्यामुळे महिला विविध रंगाचे विविध ब्रँडचे मेकअप प्रोडक्‍ट खरेदी करतात आणि आपले सौंदर्य वाढवतात.

अनेकांना नियमित मेकअप करणे जमत नाही त्यामुळे असंख्य मेकअप प्रोडक्‍ट दीर्घकाळ तसेच घरी पडून राहतात. अशावेळी प्रोडक्‍ट एक्सपायर होण्याआधी न वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधनांपासून नियमित वापरता येईल अशा गोष्ट बनवा. यामुळे प्रोडक्‍ट वाया जाणार नाही आणि तुम्हाला नवीन प्रोडक्‍ट मिळेल.

वापरत नसलेले ब्‍युटी प्रोडक्ट्स 'असे' वापरा

लिपस्टिक

महिला वर्ग मोठ्या प्रमाणात लिपस्टिक विकत घेतात. कारण प्रत्येक कपड्यांवर मॅचिंग लिपस्टिक हवी असते. वेगवेगळ्या ब्रँडच्या वेगवेगळ्या शेड्सच्या महिला लिपस्टिक खरेदी करतात. पण त्यातील एक दोन शेड्स त्या रोज वापरतात. कालांतराने जुन्या लिपस्टिक तशाच पडून राहतात आणि नवीन लिपस्टिक घरात येतात. अशावेळी जुन्या लिपस्टिक वाया घालवण्यापेक्षा किंवा टाकून देण्यापेक्षा त्यांच्यापासून टिंटेड लिप बाम बनवा. लिपस्टिक एका भांड्यात काढून गरम पाण्यामध्ये वितळवायला ठेवा. त्यात व्हॅसलीन मिक्स करून एका छोट्या डब्यात टिंटेड लिप बाम स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवा. न वापरली जाणारी लिपस्टिक आता दररोज वापरली जाईल.

आयशाडो

चेहऱ्याच्या मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप हा विशेष आणि आकर्षित असतो. यासाठी महिला वेगवेगळे प्रोडक्‍ट्स वापरतात. वेगवेगळ्या रंगांचे आयशाडो डोळ्यांवर लावले जातात ज्यामुळे स्त्रियांचे सौंदर्य खुलते. पण आयशॅडो मधील असंख्य रंग आपण अनेक वेळा वापरत नाही. त्यामुळे ते रंग वाया जातात. अशावेळी नको असलेल्या रंगाचे आयशॅडो काचेच्या बाटलीत भरा आणि त्यात थिनर मिक्स करा. नेलपॉलिशचा उत्तम शेड तयार होईल. सहज कुठे बाहेर जायचे असल्यास तुम्ही याचा वापर करू शकता.

Makeup Products Hacks
Eyebrow Tips : आयब्रोज खूप पातळ झालेत? घनदाट केसांसाठी 'हा' शानदार उपाय

फेस ऑइल

त्वचेच्या सौंदर्यासाठी महिला अनेक प्रोडक्ट्सचा वापर करतात. बाजारात मेकअप प्रोडक्‍ट खूप महाग विकले जातात. त्वचेची पोत चांगली राहण्यासाठी तसेच त्वचा हायड्रेट राहण्यासाठी महिला फेस ऑइलचा वापर करतात. पण याच फेस ऑइलपासून तुम्ही बॉडी स्क्रब देखील बनवू शकता. फेस ऑइलमध्ये थोडी साखर घालून वितळवा. याचा वापर बॉडी स्क्रब म्हणून करा. यामुळे त्वचा मुलायम राहते.

स्कीन टोनर

मेकअपच्या आधी लावण्यात येणारे स्कीन टोनर त्वचा हायड्रेट आणि निरोगी राहण्यास मदत करते. पण बऱ्याचदा वेगवेगळ्या स्कीन टोनरच्या बाटल्या आपल्या घरी अशाच पडून राहतात. अशावेळी त्या एक्सपायर होण्याआधी घरातील कपाट, मोबाईल स्क्रीन, घराच्या खिडक्या स्वच्छ पुसण्यासाठी याचा वापर करा. मिनिटांत गोष्टी चमकतील.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Makeup Products Hacks
Banana Peel Benefits: डोळ्यांखालील काळी वर्तुळे मिनिटांत होतील गायब, वाचा केळीच्या सालीचे भन्नाट फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com