Eyebrow Tips : आयब्रोज खूप पातळ झालेत? घनदाट केसांसाठी 'हा' शानदार उपाय

Beauty Care : बदलत्या हवामानाचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. आजकाल आयब्रोज पातळ होण्याची समस्या वाढत जात आहे. शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांच्या अभावामुळे आयब्रोजच्या केसांची गळती होत आहे.
Beauty Care
Eyebrow TipsSAAM TV
Published On

महिलांचे सौंदर्य हे त्यांच्या चेहऱ्याने खुलून येते. त्यामुळे महिलावर्ग चेहऱ्याची विशेष काळजी घेतात. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आयब्रोजचे केस पातळ होत जात आहेत. आयब्रोजच्या चुकीच्या शेपमुळे महिलांच्या सौंदर्याला नजर लागत आहे. आयब्रोजचे केस घनदाट ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय ट्राय करा आणि चेहऱ्याचे सौंदर्य जपा.

आयब्रोजचे केस गळण्यामागची कारणे

  • काही लोकांचे भुवयांचे केस अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे ते पटकन पडतात.

  • तुम्हाला एखादा संसर्ग झाला असल्यास भुवयांचे केस गळू शकतात.

  • शरीरातील पोषक घटकांच्या अभावामुळे आयब्रोजचे केस गळतात.

  • जास्त ताण घेतल्यामुळे शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्स होतात. याचा परिणाम आयब्रोजवर देखील होतो.

  • त्वचेच्या संबंधित कोणतीही समस्या असल्यास भुवयांचे आरोग्य बिघडते. भुवयांना खाज येते, सूज येते, भुवया लालसर होतात.

  • चुकीच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केल्यामुळे आयब्रोज पातळ होऊ शकतात. कारण चुकीच्या उत्पादनांमुळे

  • शरीरातील पीएच संतुलन बिघडते.

Beauty Care
National Mango Day 2024 : पावसाळ्यात चेहरा होईल मलईसारखा मुलायम; घरी करा मँगो फेशियल

घनदाट आयब्रोजसाठी 'या' टिप्स फॉलो करा

एरंडेल तेल

एका भांड्यात एरंडेल तेल, नारळाचे तेल आणि एलोवेरा जेल एकत्र करून रोज रात्री झोपण्यापूर्वी आयब्रोजना लावा यामुळे आयब्रोज घनदाट होतील.

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई आयब्रोजच्या केसांसाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलमधील तेलाने रोज आयब्रोजना मसाज करावा. यामुळे आयब्रोजचा रंगही छान काळा होतो.

कढीपत्ता

आयब्रोजच्या वाढीसाठी तु्म्ही कढीपत्ता वापरू शकता. कढीपत्ता छान पाण्यात गरम करून त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट रात्री झोपताना आयब्रोजना लावा. यामुळे आयब्रोजची केस गळती थांबेल आणि केस घनदाट होतील.

कांदा

पातळ झालेले आयब्रोज घनदाट करण्यासाठी कांद्याचा रस दररोज भुव्यांवर लावा. यामुळे काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

पोषक घटकांचा अभाव

आयब्रोजच्या घनदाट वाढीसाठी पोषक आहार तसेच शरीर हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Beauty Care
Weight Loss : पोटाचा घेर काही केल्या कमी होईना? आजच सुरू करा 'हा' उपाय, झटपट वजन घटेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com