Shreya Maskar
अनेक जणांना जास्त गरम पाणी आवडत नाही. त्यामुळे अशी लोक थंड-गरम पाणी एकत्र करून पितात.
दोन्ही तापमानाचे पाणी एकत्र करून प्यायल्याने आरोग्य धोक्यात येते.
गरम आणि थंड पाणी मिसळून प्यायल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते.
थंड पाणी पचायला जड जाते. तर गरम पाणी त्वरित पचते. हे पाणी एकत्र प्यायल्याने अपचन होते.
पाणी गरम केल्यामुळे ते जिवाणू विरहित असते. तर थंड पाण्यामध्ये आधीपासूनच विषाणू असतात. त्यामुळे असे पाणी प्यायल्याने आजारांना आमंत्रण मिळते.
थंड पाणी प्यायल्याने कफ होण्याचे प्रमाण वाढते. या उलट गरम पाणी कफवर रामबाण उपाय आहे. हे पाणी एकत्र प्यायल्याने पित्ताचा धोका वाढतो.
गरम आणि थंड पाणी एकत्र प्यायल्याने पचनशक्ती कमकुवत होते. तसेच पोटदुखी होऊ शकते.
गरम आणि थंड पाणी मिसळून प्यायल्याने आतड्यांना सूज येते.
पाणी एकत्र करून प्यायल्याने शरीराला पोषक तत्व मिळण्यास अडथळा येतो.
गरम पाणी प्यायल्यावर रक्तवाहिन्या विस्तृत होतात, तर थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.