Bad Digestive System : तुमची पचनक्रिया वारंवार खराब होतेय? या पदार्थांना आजच करा आहारातून बाय-बाय

Bad Digestive System Sign : पचनक्रिया सुरळीत नसेल तर अपचन, गॅस, उलटी, पोटदुखी, पोटात सूज येणे यांसारख्या समस्या होतात. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
Bad Digestive System
Bad Digestive SystemSaam Tv

Food To Avoid Suffering Digestion Problem :

हल्ली हेल्दी फूड खाण्यापेक्षा अनेकांना जंक फूड खाण्याची वाईट सवय लागली आहे. पचनक्रिया व्यवस्थित असेल तर शरीराला अनेक आजारांशी लढण्याची शक्ती देते. पचनक्रिया बिघडली तर अन्न पचन होत नाही.

पचनक्रिया सुरळीत नसेल तर अपचन, गॅस, उलटी, पोटदुखी, पोटात सूज येणे यांसारख्या समस्या होतात. त्यामुळे अनेक आजारांना (Disease) सामोरे जावे लागते. खाण्यापिण्याच्या सवयींचाही पचनावर खूप परिणाम होतो. फास्ट फूड, स्ट्रीट फूड आणि अस्वास्थ्यकर तेलकट पदार्थांचा पचनावर वाईट परिणाम होतो.

जर तुमची पचनक्रिया सतत खराब होत असेल तर आहारात (Diet) चुकूनही या पदार्थांचा समावेश करु नका. जाणून घेऊया या पदार्थांबद्दल

1. दुग्ध उत्पादने

दुग्धजन्य पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करत असाल तर पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये दूध, चीज, खवा, देशी तूप यांसारख्या अनेक पदार्थांचे (Food) सेवन करणे टाळा.

Bad Digestive System
Heart Care Tips : वाढत्या वयानुसार घ्या हृदयाची काळजी, चाळीशीनंतर या ५ टेस्ट कराच!

2. आंबट फळे

जर तुम्ही लिंबू, संत्री, टोमॅटो, काकडी इत्यादी फळे खात असाल तर याचे प्रमाण आहारातून कमी करा. यामुळे शरीरात अॅसिड तयार होते ज्याचा पचनावर परिणाम होतो.

3. तेलकट पदार्थ

जास्त तेलाचे पदार्थ खाल्ल्याने शरीरात अॅसिडीटी आणि कोलेस्टेरॉल वाढते. त्यामुळे त्याचा आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.

Bad Digestive System
Drinking Coffee Empty Stomach : रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय आहे? होऊ शकते आरोग्यावर परिणाम, दुर्लक्ष नकोच!

4. प्रक्रिया केलेले पदार्थ

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी चिप्स, कुरकरीत आणि खारट पदार्थ यांसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. यामध्ये असलेले लँटोज आणि कृत्रिम रंग शरीरासाठी हानिकारक आहे. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या निर्माण होते.

5. चहा-कॉफीचे सेवन

कॅफिनयुक्त चहा किंवा कॉफी पिणे टाळावे यामुळे गॅसची समस्या उद्भवते. तसेच अल्कोहोलचे सेवन करणे टाळावा. याचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com