Heart Care Tips : वाढत्या वयानुसार घ्या हृदयाची काळजी, चाळीशीनंतर या ५ टेस्ट कराच!

Heart Checkup : आपल्या शरीराला संपूर्णपणे निरोगी ठेवते ते हृदय. हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा न मिळाल्याने हृदयविकाराचा झटका येतो. व्यायाम, शारीरिक हालचाल किंवा धावपळ केल्यास आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात.
Heart Care Tips
Heart Care TipsSaam Tv

Essential Heart Tests in Your 40s :

आपल्या शरीराला संपूर्णपणे निरोगी ठेवते ते हृदय. हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा न मिळाल्याने हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येतो. व्यायाम, शारीरिक हालचाल किंवा धावपळ केल्यास आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात.

कमी वयात आपण कितीही शारीरिक श्रम केला तरी आपण थकत नाही. परंतु, वाढत्या वयात आपण चाललो किंवा धावलो तरी आपल्या हृदयावर परिणाम होतो. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप, शारीरिक थकवा आणि लठ्ठपणा यामुळे आपल्या हृदयावर परिणाम होतो. जर तुम्हालाही वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर हृदयाची काळजी (Care) घ्यायची असेल तर या ५ टेस्ट कराच.

1. इकोकार्डियोग्राम

हृदयाची स्थिती आणि ठोके तपासण्यासाठी इकोकार्डियोग्राम चाचणी करायला हवी. ही चाचणी तुम्ही व्यायाम केल्यानंतर करु शकता यामुळे हृदयाच्या ठोक्यांची स्थिती कळते. या चाचणीमध्ये साउंड वेबच्या मदतीने आपल्या हृदयाच्या ठोक्यांची स्थिती आणि पुरेसा रक्त पुरवठा होतोय का हे कळते.

Heart Care Tips
Ayurvedic Tips For Skin Allergy: उन्हाळ्यात घामामुळे त्वचेला ऍलर्जी आणि खाज सुटण्याची समस्या होतेय? या आयुर्वेदिक टीप्स फॉलो करा

2. ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन

ग्लोयकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्टमध्ये आपल्या शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे हे कळते. मधुमेह (Diabetes) असणाऱ्या हृदयाच्या रुग्णांसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.

3. इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG)

जर तुमच्या छातीत दुखत असेल तेव्हा हृदयाच्या ठोक्यांमधील बदलांचे निरीक्षण करण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम टेस्ट केली जाते. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ गेला आहे की, नाही हे कळते.

Heart Care Tips
Heart Attack In Women : सलग ११ तास बसल्याने महिलांमध्ये वाढतेय हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण, कशी घ्याल काळजी?

4. MRI

MRI मुळे आपल्या हृदयाचे कार्य कळते. आपल्या संपूर्ण हृदयाची रचना आणि हृदयाच्या स्नायच्या आतील जखमेच्या ऊतकांची तपासणी करण्यासाठी केली जाते.

5. सीटी स्कॅन

सीटी स्कॅन कधीकधी कोरोनरी धमनी आणि संपूर्ण हृदयाच्या संरचनेतील अडथळे तपासते. हे हृदय आणि रक्तवाहिन्यांमधील समस्या तपासण्यासाठी केले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com