Ayurvedic Tips For Skin Allergy: उन्हाळ्यात घामामुळे त्वचेला ऍलर्जी आणि खाज सुटण्याची समस्या होतेय? या आयुर्वेदिक टीप्स फॉलो करा

Home Remedies For Itchy Skin Due To Sweating: स्किन ऍलर्जीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे औषधे आणि क्रिम वापर करतो. परंतु, ही समस्या काही केल्या जात नाही.
Ayurvedic Tips For Skin Allergy: उन्हाळ्यात घामामुळे त्वचेला ऍलर्जी आणि खाज सुटण्याची समस्या होतेय? या आयुर्वेदिक टीप्स फॉलो करा
Home Remedies For Itchy Skin Due To SweatingSaam TV

Ayurvedic Tips For Skin Allergy:

वाढता सूर्यप्रकाश, उष्णता आणि घाम यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, ऍलर्जी आणि खाज येणे सामान्य आहे. त्वचेच्या ऍलर्जीमुळे अंगावर त्वचेवर खाज सुटू लागते. त्यामुळे लाल पुरळ येते. ज्यामुळे त्वचा रोग होऊ शकतो.

स्किन ऍलर्जीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे औषधे आणि क्रिम वापर करतो. परंतु, ही समस्या काही केल्या जात नाही. उन्हाळा सुरु होताच त्वचेच्या (Skin) ऍलर्जीचा त्रास होत असेल किंवा घामोळ्यांमुळे त्रस्त असाल तर या आयुर्वेदिक उपायांनी त्वचेच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.

1. ऍलर्जीची कारणे

  • कोरड्या त्वचेमुळे ऍलर्जी

  • घामामुळे बॅक्टेरिया तयार होतात.

  • धुळ आणि मातीच्या कणांमुळे त्वचेला ऍलर्जी

  • जनावरांना स्पर्श केल्यामुळे

  • औषधांचे (Medicine) सेवन

  • त्वचेवर काढलेला टॅटूचा वाईट परिणाम

Ayurvedic Tips For Skin Allergy: उन्हाळ्यात घामामुळे त्वचेला ऍलर्जी आणि खाज सुटण्याची समस्या होतेय? या आयुर्वेदिक टीप्स फॉलो करा
Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेला टॅनिंगपासून दूर ठेवायचे आहे? ट्राय करा कोकोनट मिल्क फेस पॅक

2. लक्षणे

  • त्वचेवर लाल ठिपके

  • खाज येणे

  • पिंपल्स, पुरळ येणे

  • त्वचेला जळजळ होणे

  • पित्ताची समस्या

3. आयुर्वेदिक उपाय

1. कोरफड आणि आंबा

त्वचेच्या ऍलर्जीपासून मुक्त होण्यासाठी कच्च्या आंब्याच्या (Mango) लगद्यामध्ये कोरफड मिसळून त्वचेवर लावा. कोरफडच्या जेलमध्ये हे मिसळून पेस्ट तयार करा. यामुळे त्वचेच्या ऍलर्जीचा त्रास कमी होतो. हा उपाय केल्याने त्वचेची ऍलर्जी, जळजळ, खाज आणि सूज यापासून आराम मिळतो.

Ayurvedic Tips For Skin Allergy: उन्हाळ्यात घामामुळे त्वचेला ऍलर्जी आणि खाज सुटण्याची समस्या होतेय? या आयुर्वेदिक टीप्स फॉलो करा
Dry Skin Remedies : कोरड्या त्वचेमुळे चेहरा खराब दिसतोय? आहारात करा या सूपरफूडचा समावेश

2. आइस क्यूब

त्वचेच्या ऍलर्जीपासून मुक्त होण्यासाठी आइस क्यूब हा चांगला पर्याय आहे. कोरड्या त्वचेमुळे लोकांना ‍ऍलर्जी त्रास जास्त होतो. ऍलर्जी टाळण्यासाठी उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.

3. तुरटी

जर त्वचेला सतत खाज, मुरमे आणि पुरळ येत असेल तर तुरटी लावायला हवी. ज्यामुळे खाज नियंत्रणात ठेवता येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com