Heart Attack In Women : सलग ११ तास बसल्याने महिलांमध्ये वाढतेय हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण, कशी घ्याल काळजी?

Heart Attack Symptoms : ज्या महिला दिवसभरात ११ तासांपेक्षा जास्त तास एकाच जागी बसून काम करतात त्यांच्या मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
Heart Attack, Heart Attack In Women, Heart Attack Symptoms
Heart Attack, Heart Attack In Women, Heart Attack SymptomsSaam Tv

Heart Attack Risk in Women :

कामाच्या वाढत्या व्यापामुळे महिलांना घर आणि ऑफिस हे एकाच वेळी सांभाळावे लागते. निरोगी राहाण्यासाठी शारीरिक हालचाल करणे अधिक महत्त्वाचे आहे. शारीरिकरित्या सक्रीय राहिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो.

कामामुळे अनेक महिला (Women) ऑफिसमध्ये तासनतास एकाच ठिकाणी बसून राहातात. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशातच अभ्यासातून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशन (JAHA) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, ज्या महिला दिवसभरात ११ तासांपेक्षा जास्त तास एकाच जागी बसून काम करतात त्यांच्या मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

यामध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ५००० महिलांवर संशोधन करण्यात आला. या महिलांकडून त्यांच्या आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित गोष्टींवर रिर्सच करण्यात आला. यामध्ये असे आढळून आले की, ११ तासांपेक्षा जास्त एकाच जागी बसल्याने हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊ शकतो. ज्यामुळे मृत्यूचा धोका अधिक वाढतो.

Heart Attack, Heart Attack In Women, Heart Attack Symptoms
Stress Relieving Foods : वाढत्या स्ट्रेसमुळे जडतोय डोकेदुखीचा त्रास? आहारात करा या पदार्थांचा समावेश

एकाच ठिकाणी अधिक वेळ बसल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि चयापचय दरही कमी होतो. या कारणांमुळे हृदयावर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यांसारख्या अनेक आजारांचा धोका वाढून आरोग्याला नुकसान होऊ शकते.

तसेच बैठी जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्यावरही अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकते. स्मृतिभ्रंश, तणाव अधिक वाढू शकतो.

1. कामाच्या दरम्यान स्वत:ला सक्रीय कसे ठेवाल?

  • कामाच्या दरम्यान दर अर्ध्या किंवा एका तासाने थोडा वेळ चालत राहा किंवा उभे राहून काम करा.

  • लिफ्ट ऐवजी पायऱ्याचा वापर करा.

  • दररोज ३० मिनिटे व्यायाम करा.

  • भरपूर पाणी प्या. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य देखील जपा

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com