Stress Relieving Foods : वाढत्या स्ट्रेसमुळे जडतोय डोकेदुखीचा त्रास? आहारात करा या पदार्थांचा समावेश

Mental Health : बसून काम करणारे, अधिकचा ताण, झोपेची कमतरता, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपला स्ट्रेस वाढतो. त्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढू लागते.
Stress Relieving Foods, Mental Health
Stress Relieving Foods, Mental HealthSaam Tv

How To Control Stress :

बसून काम करणारे, अधिकचा ताण, झोपेची कमतरता, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपला स्ट्रेस वाढतो. त्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढू लागते.

कामाच्या वाढत्या ताणामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.ज्यामुळे आपण मानसिक तणावाला बळी पडतो. सध्या अनेकजण तणाव, नैराश्य आणि चिंता या समस्यांचा सामना करत आहे. मानसिक आरोग्याच्या (Mental Health) समस्यांवर वेळीच उपचार न केल्यास गंभीर आजारांचा (Disease) सामना करावा लागतो.

आपल्या खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही मानसिक आरोग्यावर (Health) दिसून येतो. त्यामुळे अधिकच्या तणावाचा सामना करावा लागतो. त्यासाठी आपल्या आहारात तणाव कमी करण्याऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास डोकेदुखीच्या समस्यापासून आराम मिळवू शकता.

Stress Relieving Foods, Mental Health
Stress And Diabetes: अधिकच्या तणावामुळे जडू शकतो मधुमेहाचा विकार, कशी कराल यावर मात?

1. डार्क चॉकलेट

जर तुम्ही चॉकलेट खाण्याचे शौकिन असाल तर तणावापासून सुटका हवी असेल तर डार्क चॉकलेटचा खाऊ शकता. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असते. जे तणाव कमी करुन तुमचा मूड सुधरवतात.

2. एवोकॅडो

एवोकॉडोमध्ये पोटॅशियम आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट असते. याचे सेवन केल्यास तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रित करते.

3. गवती चहा

तणाव कमी करण्यासाठी तुम्ही हर्बल टी ची मदत घेऊ शकता. यामध्ये ग्रीन टी, लेमन टी पिऊ शकता. यामध्ये असणारे घटक मनाला आणि डोक्याला शांत करतात.

Stress Relieving Foods, Mental Health
Headache Problem : डोकं नुसतं ठणकतंय? या ५ गोष्टी करा लगेच मिळेल आराम!

4. हळद

भारतीय स्वयंपाकघरात सहज आढळणारा मसाला हळद. यामध्ये कर्क्यूमिनमध्ये समृद्ध आहे. ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे तणावाची लक्षणे कमी होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com