Headache Problem : डोकं नुसतं ठणकतंय? या ५ गोष्टी करा लगेच मिळेल आराम!

Instant Relief For Headache : डोकेदुखू लागले की, आपले कोणत्याही कामात मन लागत नाही. ही डोकेदुखी सामान्य वाटत असली तर याकडे लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतात.
Headache Problem, Instant Relief For Headache
Headache Problem, Instant Relief For HeadacheSaam TV

Home Remedies For Headache :

आजच्या धावपळीच्या जगात अनेकांना डोकेदुखीची समस्या उद्भवते. यावर मात करण्यासाठी गोळ्या घेतात. बदलती जीवनशैली, सतत लॅपटॉपवर काम करणे, प्रदूषण यामुळे डोकेदुखीच्या समस्या वाढल्या आहेत.

डोके दुखू (Headache) लागले की, आपले कोणत्याही कामात मन लागत नाही. ही डोकेदुखी सामान्य वाटत असली तर याकडे लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतात. जर तुम्हालाही औषधांना (Medicine) बाय बाय करायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय (Home remedies) सांगणार आहोत त्याच्या मदतीने तुम्हाला आराम मिळेल.

1. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत असेल तर यावर मात करण्यासाठी कपाळावर कोल्ड कॉम्प्रेस ठेवू शकता. याशिवाय सुती कपड्यात किंवा रुमालामध्ये बर्फाचे तुकडे ठेवून डोक्यावर ठेवल्याने आराम मिळेल.

Headache Problem, Instant Relief For Headache
सकाळी उठताच बॉडीमध्ये दिसताय ही लक्षणे? असू शकते High Blood Pressure ची समस्या, वेळीच घ्या काळजी

2. डोकेदुखीची अनेक कारणे आहेत. यामध्ये टोपी, स्विमिंग गॉगल किंवा घट्ट रबर बँड बांधल्याने देखील ही समस्या येते. अशावेळी हलक्या हाताने डोक्याची मालिश करा आराम मिळेल.

3. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एक्यूप्रेशर हा देखील चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही तळवे उघडू शकता आणि दुसऱ्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांच्यातील जागेवर हलक्या दाबाने मालिश करु शकता. ५ मिनिटे असे केल्याने त्वरित आराम मिळेल.

Headache Problem, Instant Relief For Headache
Sweet After Dinner : थांबा! जेवल्यानंतर तुम्हालाही गोड खाण्याची सवय आहे? जडू शकतात गंभीर आजार

4. जास्त वेळ च्युइंगम चघळणे हे देखील तुमच्या डोकेदुखीचे कारण असू शकते. असे केल्याने जबड्यापासून सुरु होणारी वेदना डोक्यापर्यंत पोहोचते, ज्याला तोंड देणे खूप कठीण काम होते. अशावेळी आले पाण्यात उकळून ते पाणी सेवन करु शकता. चहा किंवा डेकोक्शनमध्ये घालून प्यायल्याने डोकेदुखीपासून आराम मिळेल.

5. डोकेदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तीला पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस कपाळावर लावल्याने आराम मिळतो. डोकेदुखी दूर करणारे अनेक औषधी गुणधर्म पुदिन्यात आढळतात. यामुळे आपल्याला फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com