Drinking Coffee Empty Stomach : रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय आहे? होऊ शकते आरोग्यावर परिणाम, दुर्लक्ष नकोच!

Side Effects Of Drinking Coffee : बरेचदा कॉफी पिताना आपण अशा अनेक चुका करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रिकाम्या पोटी कॉफी पिणे आपल्यासाठी हानिकारक ठरु शकते.
Drinking Coffee Empty Stomach, Side Effects Of Drinking Coffee, Is It Bad to Drink Coffee on an Empty Stomach
Drinking Coffee Empty Stomach, Side Effects Of Drinking Coffee, Is It Bad to Drink Coffee on an Empty StomachSaam tv
Published On

Is It Bad to Drink Coffee on an Empty Stomach:

अनेकांना सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. सध्या याचे प्रमाण अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक जण कॉफीचे सेवन करतात.

बरेचदा कॉफी पिताना आपण अशा अनेक चुका करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कॉफी प्यायल्याने अनेकांना ऊर्जात्मक वाटते. तसेच चयापचयसह अनेक फायदे होतात. परंतु, रिकाम्या पोटी कॉफी (Coffee) पिणे आपल्यासाठी हानिकारक ठरु शकते.

मिळालेल्या संशोधनातून असे कळाले आहे की, रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने अपचनाच्या समस्या उद्भवतात. तसेच पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. या सवयींमुळे अॅसिडीची रिफ्लक्स होऊन कोर्टिसोलची पातळी वाढते. ज्यामुळे तणाव वाढू शकतो. रिकाम्या पोटी कॉफी (Stress) प्यायल्याने शरीराचे कसे नुकसान होते जाणून घेऊया.

Drinking Coffee Empty Stomach, Side Effects Of Drinking Coffee, Is It Bad to Drink Coffee on an Empty Stomach
Diabetes Tips : मधुमेहापासून किडनीच्या विकारांवर फायदेशीर आहे आंब्याची पाने, या पद्धतीने करा सेवन

1. चिंता आणि अस्वस्थता

कॅफिन हे उत्तेजक घटक आहे यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने चिंता, अस्वस्थता आणि तणाव वाढू शकतो. ज्यामुळे दैनंदिन कामात अडचणी येतात. लक्ष केंद्रित करण्याच्या समस्या तयार होतात.

2. अॅसिडीटीचा त्रास

कॉफीमध्ये अॅसिड असते. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पोटात अॅसिडीटीच्या समस्या वाढू शकतात. कॅफिन आणि अॅसिडच्या पातळीचे मिश्रण पोटाच्या (Stomach) अस्तरांना त्रास देऊ शकतात. ज्यामुळे छातीत जळजळ आणि अॅसिडीटी होऊ शकते. कॉफीच्या सेवनाने गॅस्ट्ररिटिस किंवा पेप्टिक अल्सरच्या समस्या उद्भवू शकतात.

Drinking Coffee Empty Stomach, Side Effects Of Drinking Coffee, Is It Bad to Drink Coffee on an Empty Stomach
Hearing Loss : तुम्हालाही कमी ऐकू येते का? दुर्लक्ष करु नका, ठरु शकतं धोकादायक; लक्षणे जाणून घ्या

3. पोषक तत्त्वांवर परिणाम

कॉफीमध्ये टॅनिन नावाचे घटक असते. ज्यामुळे शरीरातील लोह आणि कॅल्शियमसह काही पोषक तत्वांवर परिणाम करतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या होतात.

Drinking Coffee Empty Stomach, Side Effects Of Drinking Coffee, Is It Bad to Drink Coffee on an Empty Stomach
Processed Foods : तुम्हालाही बाहेरचे चटकदार पदार्थ खाण्याची सवय आहे? जडू शकतात ३२ पेक्षा जास्त गंभीर आजार, संशोधनातून खुलासा

4. स्ट्रेस

कॉफीमुळे स्ट्रेस हार्मोन उत्तेजित होतात. त्याच्या उच्च पातळीचे आरोग्यावर परिणाम होतात. यामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे, वजन वाढणे आणि मूड स्विंग्स होतात. सतत ताण आल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते.

5. रक्तातील साखर वाढणे

कॅफीन इंसुलिन आणि ग्लुकोजची चयापचय प्रभावित करते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे मधुमेहाचा आजार उद्भवू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com