Hearing Loss : तुम्हालाही कमी ऐकू येते का? दुर्लक्ष करु नका, ठरु शकतं धोकादायक; लक्षणे जाणून घ्या

Hearing Loss Causes : एक किंवा दोन्ही कानांमधून अर्धवट किंवा पूर्णपणे आवाज ऐकू येत नसला तर या स्थितीला हिअरिंग लॉस किंवा बहिरेपणा असे म्हणतात.
Hearing Loss
Hearing Loss Saam TV

Hearing Loss Symptoms :

हल्लीच्या तरुण पिढीपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांकडे इअरफोन्स आपल्याला सहज पाहायला मिळतात. प्रवासाचा सोबती असो किंवा महत्त्वाची मिटिंग असो किंवा अजून काही... इअरफोनचे बाजारात अनेक नवीन ब्रॅड्सही आपल्याला मिळाले आहेत. वायरलेसपासून ते ब्लूटूथपर्यंत.

अनेकांना असे वाटते की, इअरफोनचा (Earphones) अतिवापर केल्याने बहिरेपणा येतो, यामागचे खरे कारण काय? बहिरेपणा कसा येतो? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्सचे सल्लागार ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन डॉ राजेंद्र वाघेला म्हणतात एक किंवा दोन्ही कानांमधून अर्धवट किंवा पूर्णपणे आवाज ऐकू येत नसला तर या स्थितीला हिअरिंग लॉस किंवा बहिरेपणा असे म्हणतात.

कानाच्या बाबतीत उद्भवणारी मुख्य समस्या म्हणजे श्रवणशक्ती कमी होणे. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला एका कानाने किंवा दोन्ही कानाने अंशत: किंवा पूर्णपणे ऐकू येत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हळूहळू ही समस्या वाढू लागते.

Hearing Loss
शरीरात Blood Sugar वाढल्यावर दिसतात ही ५ लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष; अन्यथा...

श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे लोकांच्या जीवनावर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा व्यक्तींना दैनंदिन कामकाजात संभाषण समजण्यात अडचण येते. चांगला आवाज येतो, परंतु एखादी गोष्ट समजण्यास त्रास होतो आणि त्यामुळे एखादे वाक्य पुन्हा-पुन्हा बोलण्याची विनंती करावी लागते.

1. कारणे कोणती?

श्रवण क्षमता कमी होणे किंवा जन्मतः श्रवण शक्ती कमी असू शकते किंवा भविष्यात ही समस्या विकसित होऊ शकते, कोणत्याही वयोगटातील लोकांना ही समस्या प्रभावित करते.

Hearing Loss
Processed Foods : तुम्हालाही बाहेरचे चटकदार पदार्थ खाण्याची सवय आहे? जडू शकतात ३२ पेक्षा जास्त गंभीर आजार, संशोधनातून खुलासा

श्रवणशक्ती कमी असलेल्या लोकांना त्यांच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यामुळे कामाच्या ठिकाणी देखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कारण त्यांना सूचना ऐकण्यास किंवा संभाषणांमध्ये प्रभावीपणे सहभागी होण्यास त्रास होऊ शकतो.

मुलांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याचे परिणाम विशेषतः चिंताजनक आहेत कारण ते त्यांच्या भाषा आत्मसात करण्याच्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अडथळा निर्माण करु शकतात.

Hearing Loss
Interesting Name Of Railway Station: बाप, चाचा, नाना, साली...; भारतातील भन्नाट रेल्वे स्टेशन, नाव ऐकून हसू थांबणारच नाही

प्रौढांमध्ये ते विविध अडथळे निर्माण करतात जे त्यांचे करिअर आणि वैयक्तिक संबंध या दोन्हींमध्ये व्यत्यय आणू शकतात. याचा परिणाम नोकरीच्या कामगिरीवर आणि करिअरच्या प्रगतीवर होऊ शकतो. शिवाय, श्रवणशक्ती कमी होण्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे चिंता (Stress) आणि नैराश्याच्या (Depression) भावना निर्माण होतात.

जीवनाच्या सुधारित गुणवत्तेसाठी श्रवणसक्ती कमी झाल्याचे वेळीच निदान करणे महत्वाचे आहे. वेळाच निदान झाल्याने योग्य उपचार करता येणे शक्य असते जेणेकरुन श्रवण क्षमता गमावण्याचा धोका राहत नाही. गंभीर श्रवणदोषाचा सामना करणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी श्रवणयंत्र, कॉक्लियर इम्प्लांट आणि थेरपी यांसारखे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध आहेत.

Hearing Loss
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या 4 राशींसाठी हा आठवडा अडचणींचा; वाचा एका क्लिकवर साप्ताहिक भविष्य

Otoacoustic Emissions (OAE), ऑडिओमेट्री, ऑडीटरी ब्रेनस्टेम रिस्पॉन्स (ABR), आणि हाय-रिझोल्यूशन इमेजिंग (CT MRI) यासारख्या साधनांचा वापर करुन अचूक निदान करणे शक्य असते.

श्रवणशक्ती कमी होण्याची गुंतागुंत ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. कॉक्लियर इम्प्लांट, श्रवण यंत्र आणि समुपदेशन यांसारखे पर्याय रुग्णांना योग्य ठरतात. प्रत्येकाने त्यांच्या श्रवण क्षमतेकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांना श्रवणविषयक समस्या असल्यास त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com