Milk Storage Tips: दूध फ्रिजमध्ये ठेवूनही लवकर खराब होतंय? फ्रिजमधील 'ही' जागा ठरू शकते कारण; नेमकं कुठे ठेवावं दूध?

Never Store Milk In Fridge Door: फ्रिजमध्ये दूध ठेवूनही ते लवकर खराब होतंय का? फ्रिजच्या दरवाजात दूध ठेवण्याची चूक टाळा. दूध जास्त वेळ ताजं ठेवण्यासाठी फ्रिजमधील योग्य जागा कोणती, दूध साठवण्याची पद्धत काय आणि खराब दूध कसं ओळखावं, जाणून घ्या.
Milk Storage Tips
Milk Storage Tipssaam tv
Published On: 

दूध विकत आणल्यानंतर ते खराब होऊ नये म्हणून आपण लगेच फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही अनेकदा दूध लवकर खराब होतं. कधी दुधाची चव बदलते, तर कधी त्याला आंबट वास येऊ लागतो. अशावेळी आपण दूधच खराब असल्याचा विचार करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? फ्रिजमध्ये दूध नेमकं कुठे ठेवलं आहे, यावरही त्याची ताजेपणा टिकण्याची गोष्ट अवलंबून असते.

फ्रिजमधील प्रत्येक भागाचं तापमान सारखं नसतं. काही ठिकाणी तापमान वारंवार बदलतं, तर काही भागांमध्ये थंडावा जास्त आणि स्थिर असतो. त्यामुळे दूध फ्रिजमध्ये ठेवताना योग्य जागा निवडणं महत्त्वाचं आहे.

फ्रिजमध्ये कुठेही दूध ठेवू नका

दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ लवकर खराब होऊ शकतात. तापमानात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा परिणाम या पदार्थांवर होतो. फ्रिजचा दरवाजा वारंवार उघडला जातो. त्यामुळे दरवाजाच्या आसपासच्या भागात बाहेरची गरम हवा पोहोचते. याशिवाय फ्रिजच्या मागच्या बाजूला आणि खालच्या भागात जास्त थंडावा असतो. या ठिकाणी तापमानही तुलनेने स्थिर राहतं. त्यामुळे दूध अशा जागी ठेवावं, जिथे तापमानात वारंवार बदल होत नाही.

Milk Storage Tips
Kitchen door direction: किचनचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घर बांधताना वास्तुशास्त्रातील हे नियम लक्षात ठेवा

फ्रिजच्या दरवाजात दूध ठेवणं योग्य आहे का?

अनेक जण दुधाचं पॅकेट किंवा बाटली फ्रिजच्या दरवाजात ठेवतात. पण ही सवय बदलणं गरजेचं आहे. कारण फ्रिजच्या दरवाजात तापमानात सर्वाधिक बदल होत असतो. ज्यावेळी आपण फ्रिजचा दरवाजा उघडतो तेव्हा बाहेरची हवा आत येते. त्यामुळे दरवाजात ठेवलेलं दूध काही वेळ गरम होतं आणि पुन्हा थंड होतं. तापमानात वारंवार होणाऱ्या या बदलामुळे दूध लवकर खराब होऊ शकतं. फ्रिजच्या दरवाजात अशा वस्तू ठेवणं चांगलं, ज्या जास्त दिवस टिकतात आणि तापमानात थोडा बदल झाला तरी लवकर खराब होत नाहीत.

दूध ठेवण्यासाठी फ्रिजमधील योग्य जागा कोणती?

दूध ठेवण्यासाठी फ्रिजच्या मागच्या बाजूची जागा अधिक चांगली मानली जाते. त्यासाठी मधला किंवा खालचा कप्पा निवडू शकता. या ठिकाणी थंडावा जास्त असतो आणि तापमानातही फार बदल होत नाही. दूध वापरल्यानंतर त्याचं पाकीट किंवा बाटली व्यवस्थित बंद करावी. यामुळे दुधाचा हवेशी संपर्क कमी होतो. त्याचप्रमाणे फ्रिजमधील इतर पदार्थांचा वास दुधाला लागण्याची शक्यताही कमी होते.

दूध शक्यतो त्याच पाकिटात किंवा बाटलीत ठेवावं, ज्यामध्ये ते विकत घेतलं आहे. कारण दुधाची पाकिटं अशा पद्धतीने तयार केलेली असतात, ज्यामुळे दूध प्रकाश आणि बाहेरील गोष्टींच्या संपर्कापासून सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

दूध जास्त वेळ फ्रिजबाहेर ठेवू नका

दूध वापरल्यानंतर ते पुन्हा फ्रिजमध्ये ठेवायला उशीर करू नका. दूध जास्त वेळ बाहेर राहिलं, तर त्याचं तापमान वाढतं. त्यामुळे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढं दूध वापरायचं आहे, तेवढंच आधी बाहेर काढा. उरलेलं दूध लगेच फ्रिजमध्ये ठेवा.

Milk Storage Tips
Microwave Placement Vastu: किचनमध्ये फ्रीजच्या जवळ मायक्रोवेव ठेवावा का? जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार दोघांमध्ये किती अंतर असलं पाहिजे?

सर्व प्रकारच्या दुधासाठी हीच पद्धत योग्य आहे का?

फ्रिजमध्ये दूध ठेवण्याचे हे नियम बहुतांश दुधांसाठी लागू होतात. फुल क्रीम दूध असो, कमी फॅट असलेलं दूध असो किंवा स्किम्ड दूध, ते फ्रिजमधील जास्त थंड आणि तापमान स्थिर असलेल्या जागी ठेवणं चांगलं.

बदामाचं दूध, ओट मिल्क आणि सोया मिल्क यांसारख्या दुधांसाठीही हेच नियम लागू होतात. तापमानातील बदलांचा या दुधांवर तुलनेने कमी परिणाम होऊ शकतो. तरीही ही दूधं फ्रिजमधील थंड जागी आणि व्यवस्थित बंद केलेल्या पाकिटात किंवा बाटलीत ठेवणं योग्य आहे.

Milk Storage Tips
Microwave Placement: किचनमध्ये मायक्रोवेव्ह कोणत्या दिशेला ठेवावा? चुकीच्या ठिकाणी ठेवणं पडेल महागात, वास्तूनुसार जाणून घ्या योग्य दिशा

दूध खराब झालंय हे कसं ओळखाल?

योग्य पद्धतीने दूध ठेवलं तरी ते कायम टिकत नाही. त्यामुळे दूध वापरण्यापूर्वी ते खराब झालं आहे का, हे तपासणं गरजेचं आहे.

  • दुधाचा वास बदलणं

  • दुधाचा रंग बदलला असणं

  • दुधाचे वेगवेगळे थर तयार होणं

  • दुधाची चव बदलली असणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.