Microwave Placement Vastu: किचनमध्ये फ्रीजच्या जवळ मायक्रोवेव ठेवावा का? जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार दोघांमध्ये किती अंतर असलं पाहिजे?

Fridge and Microwave Vastu Tips: किचनमध्ये फ्रिज आणि मायक्रोवेव ठेवताना किती अंतर असावे? वास्तुशास्त्रानुसार या दोन्ही उपकरणांसाठी कोणत्या दिशा शुभ मानल्या जातात? फ्रिज, मायक्रोवेव आणि गॅस शेगडी ठेवण्याचे वास्तु नियम तसेच सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
Microwave Placement Vastu
Microwave Placement Vastusaam tv
Published On: 

आजकाल प्रत्येक घरातील किचनमध्ये फ्रिज आणि मायक्रोवेव या दोन्ही वस्तू असतात. अन्नपदार्थ ताजे ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो तर जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेवचा उपयोग होतो. पण किचनमध्ये या दोन्ही वस्तू ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, फ्रिज आणि मायक्रोवेव एकमेकांच्या अगदी जवळ ठेवणं योग्य मानलं जात नाही. मग या दोन्ही वस्तूंमध्ये किती अंतर असावं आणि त्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात? जाणून घेऊया.

फ्रिज आणि मायक्रोवेवमध्ये किती अंतर असावं?

वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, फ्रिज आणि मायक्रोवेव यांच्यामध्ये कमीत कमी १ ते २ फुटांचं अंतर ठेवणं चांगलं मानलं जातं. या दोन्ही वस्तू एकमेकांच्या अगदी शेजारी ठेवण्याऐवजी त्यांच्यामध्ये थोडी मोकळी जागा ठेवावी. त्याचप्रमाणे मायक्रोवेव थेट फ्रिजच्या वर ठेवणं टाळावं. शक्य असल्यास दोन्ही उपकरणं किचनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावीत.

Microwave Placement Vastu
Cloth Vastu: धुतलेले कपडे कुठे वाळवताय? वास्तुशास्त्राचा हा नियम माहिती नसेल तर एका रात्रीतच होऊ शकता कंगाल

वास्तुशास्त्रानुसार फ्रिज कोणत्या दिशेला ठेवावा?

वास्तुशास्त्रानुसार फ्रिज ठेवण्यासाठी दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम या दिशा शुभ मानल्या जातात. त्यामुळे किचनमध्ये फ्रिज ठेवताना या दिशांचा विचार करावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते, अशी वास्तुशास्त्राची मान्यता आहे.

मायक्रोवेव आणि गॅस शेगडीसाठी कोणती दिशा योग्य?

मायक्रोवेवचा संबंध उष्णतेशी असल्यामुळे वास्तुशास्त्रानुसार तो दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. याच दिशेला गॅस शेगडी ठेवणंही योग्य मानलं जातं. त्यामुळे किचनची मांडणी करताना या दिशेचा विचार करावा.

Microwave Placement Vastu
Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये गॅस शेगडी कोणत्या दिशेला असावी? स्वयंपाक करताना कोणत्या दिशेला तोंड असावं? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

फ्रिज आणि मायक्रोवेव ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रासोबतच या उपकरणांच्या सुरक्षिततेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. फ्रिजच्या मागील बाजूला आणि आजूबाजूला हवा बाहेर जाण्यासाठी पुरेशी जागा ठेवावी. मायक्रोवेव ठेवताना त्याच्या आजूबाजूला हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे दोन्ही उपकरणं एकमेकांच्या उष्णतेपासून दूर ठेवावीत. यामुळे उपकरणांचा वापर सुरक्षितपणे करता येतो.

त्यामुळे किचनमध्ये फ्रिज आणि मायक्रोवेव ठेवताना वास्तुशास्त्रातील मान्यतांसोबतच सुरक्षिततेचे नियमही पाळणं गरजेचं आहे.

Microwave Placement Vastu
Vastu Tips: घरातील जुने कपडे आणि अंतर्वस्त्र लादी पुसण्यासाठी वापरताय? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.