Vastu Tips: घरातील जुने कपडे आणि अंतर्वस्त्र लादी पुसण्यासाठी वापरताय? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

Vastu Shastra: घराची साफसफाई करताना अनेक जण जुन्या कपड्यांचा वापर करतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांचे जुने कपडे, दिवंगत व्यक्तींचे कपडे आणि फाटलेल्या अंतर्वस्त्रांचा वापर टाळावा, अशी मान्यता आहे. जाणून घ्या यामागील धार्मिक समजुती आणि कोणती काळजी घ्यावी.
Vastu Shastra
Vastu Shastrasaam tv
Published On: 

घर छान दिसावं यासाठी ते टापटीप ठेवणं गरजेचं आहे. घराची नियमित साफसफाई केल्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येतं. घरातील स्वच्छतेसोबतच घरात सुख-शांती आणि समृद्धी टिकून राहावी, अशीही प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे अनेक जण घराची साफसफाई करताना जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचा वापर करतात.

लहान मुलांचे जुने कपडे असोत किंवा घरातील मोठ्या व्यक्तींचे जुने कपडे, त्यांचा वापर अनेकदा घर पुसण्यासाठी केला जातो. मात्र वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक जुन्या कपड्याचा वापर साफसफाईसाठी करणं योग्य नाही. काही कपड्यांचा वापर केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, असं वास्तुशास्त्रात सांगितलंय. त्यामुळे घराची साफसफाई करताना कोणत्या कपड्यांचा वापर टाळावा, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Vastu Shastra
Vastu Tips: फ्रिजच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू; घरात सुख-समृद्धी टिकवण्यासाठी वास्तूचे हे नियम नक्की पाळा

लहान मुलांचे जुने कपडे

घरात लहान मुलं असतील तर त्यांचे कपडे लवकर लहान होतात. त्यामुळे अनेकदा हे जुने कपडे घरात साठवून ठेवले जातात. काही जण या कपड्यांचा वापर घरातील साफसफाईसाठी करतात. पण वास्तुशास्त्रानुसार असं करणं योग्य मानलं जात नाही. लहान मुलांच्या जुन्या कपड्यांचा पुसण्यासाठी वापर केल्यास त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे.

दिवंगत व्यक्तींचे कपडे

काही घरांमध्ये निधन झालेल्या व्यक्तींचे जुने कपडे घर पुसण्यासाठी किंवा साफसफाईसाठी वापरले जातात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे कपडे अशा कामांसाठी वापरले जातात. पण वास्तुशास्त्रानुसार, दिवंगत व्यक्तींच्या कपड्यांचा वापर साफसफाईसाठी करू नये. असं करणं योग्य मानलं जात नाही.

Vastu Shastra
Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

अंतर्वस्त्रांचा वापर टाळा

अनेकदा फाटलेल्या अंतर्वस्त्रांचा, बनियनचा वापर घर पुसण्यासाठी केला जातो. काही जण या कपड्यांचा वापर घरातील वस्तूंची धूळ पुसण्यासाठी, गाडी धुण्यासाठी किंवा इतर साफसफाईच्या कामांसाठी करतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार, अशा कपड्यांचा वापर करणं टाळावं. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते, असं मानलं जातं.

जुन्या कपड्यांचा वापर का करू नये?

वास्तुशास्त्रानुसार, फाटलेल्या आणि जुन्या कपड्यांचा वापर घर पुसण्यासाठी किंवा साफसफाईसाठी करू नये. एखाद्या व्यक्तीची ऊर्जा त्याने वापरलेल्या कपड्यांमध्ये राहते आणि कालांतराने तिचं रूपांतर नकारात्मक ऊर्जेत होतं, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. याचा व्यक्तीला त्रास होऊ शकतो.

धार्मिक मान्यतेनुसार, जुन्या कपड्यांनी घर पुसल्यास घरात अशांतता निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे घरातील सदस्यांमध्ये वाद आणि भांडणं होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीये. त्यामुळे वापरलेले जुने कपडे घर पुसण्यासाठी वापरण्याऐवजी गरजू व्यक्तींना दान करावेत, असा सल्ला दिला जातो.

Vastu Shastra
Evening Diya Rules: दररोज संध्याकाळी घरी दिवा लावताय ना? नकळत होणाऱ्या या चुका टाळा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.