

आजकाल प्रत्येक घरातील किचनमध्ये फ्रिज असतो. दूध, भाज्या, फळं आणि शिजवलेलं अन्न ताजं ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र किचनमध्ये फ्रिज नेमका कोणत्या दिशेला ठेवावा, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतो. वास्तुशास्त्रानुसार, घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्हीही किचनमध्ये फ्रिज ठेवण्यासाठी जागा शोधत असाल, तर काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये फ्रिज ठेवण्यासाठी दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम दिशा योग्य मानली जाते. फ्रिज आकाराने मोठा आणि वजनाने जड असतो. त्यामुळे तो या दिशांना ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तुमच्या किचनमध्ये या दिशांना जागा नसेल तर दक्षिण-पूर्व दिशेलाही फ्रिज ठेवण्यासाठी पर्याय म्हणून निवडता येऊ शकतं.
वास्तुशास्त्रात, दक्षिण-पूर्व दिशेला आग्नेय कोन असं म्हटलं जातं. या दिशेला इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठेवणं योग्य मानलं जातं. त्यामुळे किचनमध्ये फ्रिज ठेवण्यासाठी दक्षिण-पूर्व दिशेचाही विचार करता येतो. याशिवाय फ्रिज ठेवताना त्याचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडतो याकडेही लक्ष द्यावं, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला फ्रिज ठेवणं टाळावं. ही दिशा जलतत्त्वाशी संबंधित मानली जाते. या दिशेला जड वस्तू ठेवणं योग्य नसल्याचं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. त्यामुळे फ्रिज ठेवण्यासाठी जागा निवडताना ईशान्य दिशा टाळण्याचा सल्ला दिला जातो.
किचनमध्ये फ्रिज ठेवताना तो गॅस शेगडीच्या अगदी जवळ ठेवू नये. फ्रिज आणि गॅस शेगडी यांच्यामध्ये पुरेशी जागा असणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार या दोन्हींच्या मध्ये किमान एक फूट अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय फ्रिजचा दरवाजा पूर्व किंवा दक्षिण दिशेला उघडेल, अशा प्रकारे तो ठेवावा, असंही सांगितलं जातं.
फ्रिज कोणत्या दिशेला ठेवला आहे, यासोबतच त्याची स्वच्छता राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. फ्रिजमध्ये खराब झालेलं किंवा सडलेलं अन्न जास्त काळ ठेवू नये. वेळोवेळी फ्रिज स्वच्छ करावा आणि त्यातील खराब पदार्थ बाहेर काढावेत. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, फ्रिजमध्ये खराब अन्न साठवून ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.